logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ladki Bahin Yojna : सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार, पण २१०० रुपये नक्की मिळणार कधी? मोठी अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojna : सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाढवून देणार, पण २१०० रुपये नक्की मिळणार कधी? मोठी अपडेट आली समोर

Dec 02, 2024, 08:24 PM IST

google News
  • Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. आता भाजपच्या मोठ्या नेत्याने ही वाढ नेमकी कधी देण्य़ात येईल, याबाबत खुलासा केला आहे.

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. आता भाजपच्या मोठ्या नेत्याने ही वाढ नेमकी कधी देण्य़ात येईल, याबाबत खुलासा केला आहे.

  • Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. आता भाजपच्या मोठ्या नेत्याने ही वाढ नेमकी कधी देण्य़ात येईल, याबाबत खुलासा केला आहे.

Ladki Bahin Yojana Update : निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने बहुचर्चित 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० हजार रुपये देण्य़ात आले. निवडणूक प्रचारात ही योजना खूपच चर्चेत राहिली होती. ही योजना टर्निंग पॉईंट ठरली व महायुती पुन्हा सत्तेत आली. आता या योजने संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करण्यात येईल, असे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते. आता भाजपच्या मोठ्या नेत्याने ही वाढ नेमकी कधी देण्य़ात येईल, याबाबत खुलासा केला आहे.

महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांमध्ये वाढ करून २१०० रुपये देण्याची घोषणा केली होती. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्य़ामुळे महिलांना २१०० रुपये मिळतील, असं बोललं जात आहे. दुसरीकडे तर महाविकास आघाडीनं देखील राज्यात सरकार आल्यास ही योजना बंद न करता लाडक्या बहिणींना प्रतिमहिना ३००० रुपये देण्यात येतील, अशी ग्वाही दिली होती. मात्र महिलांना महायुतीवर विश्वास दाखवत त्यांच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले. त्यानुसार आता महायुती पुन्हा सत्तेत आल्यानं नवीन सरकार कधी पैसे वाढवतंय याकडं लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे.

शिंदे सरकारने मागील अर्थसंकल्पात लाडकी बहीण  योजनेची घोषणा केल्यानंतर  राज्यातील  जवळपास २.५ कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा करण्यात आले. यासाठी सरकारने जवळपास ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र या योजनेची रक्कम वाढवून २१०० रुपये केल्यास सरकारवरील बोझा वाढणार आहे. 

तज्ज्ञांच्या मतानुसार, जर महिलांच्या खात्यात जमा होणारी रक्कम वाढवली, तर सरकारला जवळपास ४६  हजार कोटींची तरतूद करावी लागणार आहे. परंतु, सरकारला हे पैसे कुठून मिळणार आहेत आणि याचे पर्याय काय आहेत? याची स्पष्टता नाही.

राज्यातील २१ वर्षे ते ६५ वर्षांपर्यंत वयोमर्यादा असलेल्या सुमारे दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ झाला असल्याचा दावा महायुतीने केला आहे. या रक्कमेत आता लवकरच वाढ केली जाणार असल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. पण किती काळ वाट पाहावी लागेल? याचंही उत्तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

महिलांना कधी मिळणार २१०० रुपये ?

एका वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या बहिणींना निवडणुकीत दिलेलं आश्वासन आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आहोत. योजनेच्या पैशांमध्ये १५०० वरुन २१०० रुपये वाढ केली जाणार आहे, तसे न केल्य़ास देशभरात आमची प्रतिमा खराब होईल. पण कोणत्या महिन्यापासून वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. गेल्यावर्षी रक्षाबंधनाला ही योजना सुरु झाली त्यानंतर पुढच्या भाऊबीजेला याची रक्कम २१०० रुपये होईल. असे मुनगंटीवार यांनी म्हटले. याचा अर्थ लाडक्या बहिनींना २१०० रुपयांसाठी जवळपास वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. मुनगंटीवार यांनी पुढे म्हटले की, या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणार आहे.

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या