माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी केली अटक; २०१४ मधील प्रकरणात कारवाई
Published Feb 18, 2025 07:55 AM IST
- Harshwardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ मधील एका प्रकरणात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Harshwardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ मधील एका प्रकरणात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
- Harshwardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ मधील एका प्रकरणात न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Harshwardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. २०१४ च्या एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी हर्षवर्धन जाधव यांना वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, असे असतांना देखील ते न्यायालयात सुनावणीला हजर राहिले नव्हते. त्यांच्यावर सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण कोर्टात गेले. मात्र कोर्टात एकदाही हर्षवर्धन जाधव हजर राहिले नव्हते. यानंतर आज जवळपास १० वर्षांनंतर हर्षवर्धन जाधव न्यायालयात उपस्थित झाले. हर्षवर्धन जाधव हे अनेकदा गैरहजर राहिल्याने त्यांना अटक करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांना अटक केली आहे.
हर्षवर्धन जाधव हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार आहेत. २०१४ मध्ये त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट काढण्यात आले होते. मात्र ते न्यायालयात हजर होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आले. हर्षवर्धन पाटील हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभव झाला. त्यांच्या पत्नी संजना जाधव यांनी त्यांचा पराभव केला.
काय आहे प्रकरण ?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २०१४ मध्ये नागपूर दौऱ्यावर आले असता, एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. मात्र, त्यावेळी, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नकार दिल्यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला होता. या घटनेत त्यांच्यावर ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हात त्यांना अनेक वेळा वॉरंट काढण्यात आले होते. मात्र, ते हजर झाले नव्हते. त्यांच्यावर नॉन बेलेबल वॉरंट कडण्यात आले. या प्रकरणी ते १० वर्षांनी कोर्टात हजर झाल्यावर त्यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. न्यायालयाने त्यांना तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्याची शक्यता आहे. सध्या त्यांना २४ तास ऑब्झर्वेशनमध्ये आले आहे. त्यांनी छातीत वेदना होत असल्याची तक्रार केल्यावर हा निर्णय घेतण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांना यापूर्वी देखील पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने १ वर्षाची सक्तमजुरी व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती.
विभाग