logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवर खासदार श्रीकांत शिंदे हे स्वत:च बोलले, म्हणाले…

उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेवर खासदार श्रीकांत शिंदे हे स्वत:च बोलले, म्हणाले…

Dec 02, 2024, 03:24 PM IST

google News
    • Shrikant Shinde on Maharashtra Deputy CM: एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.
माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या- श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde on Maharashtra Deputy CM: एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

    • Shrikant Shinde on Maharashtra Deputy CM: एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत.

Maharashtra Politics: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे येत्या ५ डिसेंबर २०२४ रोजी स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत', असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

पुढे श्रीकांत शिंदे म्हणाले की, 'लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा आहे', असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे हे शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. मात्र, त्यावेळी नवे सरकार स्थापन झाल्याने शिंदे खूश नसल्याची चर्चा होती. मुंबईला रवाना होण्यापूर्वी रविवारी आपल्या गावी पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल आणि त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल, असे मी आधीच सांगितले आहे, असे शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांची गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती.

संबंधित बातम्या

विभाग

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या