logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'बेस्ट'चा बेस्ट निर्णय; दादरहून दर १५ मिनिटाला बस सुटणार

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'बेस्ट'चा बेस्ट निर्णय; दादरहून दर १५ मिनिटाला बस सुटणार

Dec 03, 2024, 02:41 PM IST

google News
    • Mahaparinirvan Din BEST service : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांच्या सोईसाठी बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. चैत्यभूमीसाठी दर १५ मिनिटांनी गाड्या सोडल्या जाणार आहे.
महापरिनिर्वान दिनानिमित्त चैत्यभूमीला जाणाऱ्यांसाठी 'बेस्ट'चा बेस्ट निर्णय, दादरमधून दर १५ मिनिटाला सुटणार बस (HT)

Mahaparinirvan Din BEST service : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांच्या सोईसाठी बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. चैत्यभूमीसाठी दर १५ मिनिटांनी गाड्या सोडल्या जाणार आहे.

    • Mahaparinirvan Din BEST service : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. त्यांच्या सोईसाठी बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. चैत्यभूमीसाठी दर १५ मिनिटांनी गाड्या सोडल्या जाणार आहे.

Mahaparinirvan Din BEST sevise : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दरवर्षी चैत्यभूमीवर भीम अनुयायी येत असतात. या वर्षी शुक्रवारी महापरिनिर्वाण दिवस असून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. त्यामुळे त्यांना चैत्यभूमी येथे जाता यावे यासाठी बेस्टने बस फेऱ्यावाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी बेस्टकडून चैत्यभूमीसाठी ४ ते ७ डिसेंबर दरम्यान, दर १५ टए २० मिनिटाला बस सोडल्या जाणार आहेत. या बस दादर रेल्वे स्थानकापासून सोडल्या जाणार आहेत. या सोबतच नागरिकांना ६० रुपयांत पास देखील दिला जाणार आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे चैत्यभूमी असून या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी दरवर्षी येत असतात. या ठिकाणी येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये या साठी रेल्वे व बेस्ट प्रशासनामार्फत दरवर्षी विशेष नियोजन केलं जातं. यावर्षी देखील मुंबई व बाहेरगावाहून येणाऱ्या अनुयायांसाठी दादर स्थानक ते शिवाजी पार्क मैदान- चैत्यभूमी येथे जाण्याकरीता दादर रेल्वे स्थानक येथून विशेष बस सोडल्या जाणार आहेत. 

उद्या ४ तारखेपासून ही बस सुविधा सुरू केली जाणार आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बसमार्ग क्रमांक २००, ३४१, ए ३५१ आणि ३५४ या बस या मार्गावर चालवल्या जाणार आहे. तर ६ तारखेला शिवाजी पार्क येथूनही सी ३३, ए १५६४, २४१, सी ३०५, ए ३५१, ३५४, ए-३५७, ए-३८५, सी-४४० आणि सी-५२१ या बसमार्गावर अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. या बसही छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळून उपलब्ध करण्यात येतील. सकाळी ७.३० ते सकाळी १० वाजेपर्यंत या फेऱ्या सुरू राहणार आहेत.

दरम्यान, प्रशासनातर्फे देखील या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पाण्याची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था या सह चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतुकी देखील मोठा बदल करण्यात येणार आहे. नागरिकांना हा वाहतूक बदल लक्षात घेऊन प्रवास करावा लागणार आहे. 

 

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या