logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नागपूरच्या टेलरने शिवले आवडत्या रंगाचे खास कोट !

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नागपूरच्या टेलरने शिवले आवडत्या रंगाचे खास कोट !

Dec 03, 2024, 11:09 AM IST

google News
    • Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे गुरुवारी पाच तारखेला शपथ घेणार आहे. या साठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. नागपूर येथील एका टेलरने त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडत्या रंगाचे कोट शिवले आहेत. 
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसाठी नागपूरच्या टेलरने शिवले आवडत्या रंगाचे खास कोट !

Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे गुरुवारी पाच तारखेला शपथ घेणार आहे. या साठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. नागपूर येथील एका टेलरने त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडत्या रंगाचे कोट शिवले आहेत.

    • Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे गुरुवारी पाच तारखेला शपथ घेणार आहे. या साठी आझाद मैदानावर तयारी सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता आहे. नागपूर येथील एका टेलरने त्यांच्यासाठी खास त्यांच्या आवडत्या रंगाचे कोट शिवले आहेत. 

Devendra Fadnavis News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची जोरदार तयारी आझाद मैदानावर सुरू आहे. या साठी भव्य मंडप उभारण्यात येत आहे. हा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला संध्याकाळी होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. नगपूरकरांना देखील फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशी आशा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कपडे शिवणाऱ्या एका टेलरने देखील फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या आवडीच्या रंगाचे चार कोट शिवले आहे. यातील एक कोट घालून त्यांनी शपथ घ्यावी अशी इच्छा या टेलरने व्यक्त केली आहे.

पिंटू मेहाडिया असे या टेलरचे नाव आहे. मेहाडिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ४ कोट तयार केले आहे. ते त्यांनी शपथविधी सोहळ्याला घालावे अशी त्यांची इच्छा आहे. हे कोट घेऊन ते मुंबईला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे नेहमी मेहाडिया यांच्या 'गोविंदा कलेक्शन' येथून त्यांचे कोट शिवत असतात. फडणवीस जेव्हा नागपूरचे पहिल्यांदा महापौर झाले तेव्हासुद्धा त्यांनी मेहाडिया यांच्या दुकानातूनच कोट शिवून घेतला होता.

फडणवीस यांना निळा रंग आवडतो. त्यांची ही आवड पिंटू मेहाडिया यांना ठाऊक आहे. त्यामुळे त्यांनी निळ्या रंगाच्या तीन छटांमधील वेगवेगळे कोट शिवले आहेत. यातील एक कोट हा राखाडी रंगाचा आहे. तर गुलाबी रंगाचा देखील समावेश आहे. त्यांनी गुलाबी रंगाबाबत देखील फडणवीस यांना एकदा विचारले होते. त्यावेळी त्यांनी ते नेहमी वेगवेगळ्या रंगाचे कोट घालत असल्याचे त्यांनी सांगितले होते. गुलाबी रंगाचाही कोट जॅकेट घालत असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी त्यांचे कोट शिवले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदी त्यांची वर्णी लागणार का हे आज नाही तर उद्या ठरणार आहे. त्यांचे नाव जाहीर झाल्यास फडणवीस हे मेहाडिया यांनी तयार केलेले कोट परिधान करणार का ? या कडे त्यांचे लक्ष आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदाची निवड ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता करणार आहे. केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून उपस्थित असलेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. भाजपचे जे नवनिर्वाचित आमदार नवे नेते म्हणून निवडून येतील, ते ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात शपथ घेतील. मात्र, भाजपकडून नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. पण देवेंद्र फडणवीस विधिमंडळ पक्षनेते होतील आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

विभाग

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर
दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या