logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pani-puri: लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट! ‘पाणीपुरी’ एका वेगळ्या सिनेमाची घोषणा

Pani-puri: लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट! ‘पाणीपुरी’ एका वेगळ्या सिनेमाची घोषणा

Aarti Vilas Borade HT Marathi

Published Sep 16, 2024 09:43 PM IST

google News
    • Pani-puri Movie Poster: ‘पाणीपुरी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टवर विशाखा सुभेदार आणि इतर काही कलाकार दिसत आहे.
Pani-puri

Pani-puri Movie Poster: ‘पाणीपुरी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टवर विशाखा सुभेदार आणि इतर काही कलाकार दिसत आहे.

    • Pani-puri Movie Poster: ‘पाणीपुरी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टवर विशाखा सुभेदार आणि इतर काही कलाकार दिसत आहे.

झणझणीत, तिखट, कुरकुरीत, आंबट-गोड पदार्थ म्हटलं की, पाणीपुरीच आपल्या नजरेसमोर येते. पाणीपुरी म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आणि मनालाही ते खाण्याचा मोह होतो. नात्यांच्या अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात आपल्याला चाखायला मिळणार आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर सर्वजण प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.

चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

‘पाणीपुरी’ या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले आहे. या पोस्टवर विशाखा सुभेदार आणि इतर काही कलाकार दिसत आहे. खुर्चीवर बसलेले मकरंद देशपांडे दिसत आहेत. त्यांच्या आजूबाजूला इतर कलाकार दिसत आहेत. आता हे पोस्टर पाहून चित्रपटात काय नेमकं काय पाहायला मिळणार यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

प्रत्येक नात्याची स्वतःची एक गोष्ट असते.. कधी खूप आनंद, प्रेम, विश्वास देणारी तर कधी सोबत दुःख घेऊन येणारी.. अशाच लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट ‘पाणीपुरी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
वाचा: इंटिमेट सीनसाठी दारू पाजली अन् बलात्कार केला; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मकरंद देशपांडे, सायली संजीव, ऋषिकेश जोशी, विशाखा सुभेदार, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, कैलास वाघमारे, शिवाली परब, प्रतिक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपुटकर, अभय गिते आदि कलाकार मंडळी आपल्या मनोरंजनातून ‘पाणीपुरी’ची चव आपल्याला चाखायला देणार आहेत. रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते आहेत तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.