मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Danka Movie: ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपट

Danka Movie: ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार बहुचर्चित ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपट

Aarti Vilas Borade HT Marathi

May 30, 2024, 06:05 PM IST

    • Danka Movie: गेल्या काही दिवसांपासून ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
Danka Movie: डंका चित्रपट

Danka Movie: गेल्या काही दिवसांपासून ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

    • Danka Movie: गेल्या काही दिवसांपासून ‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

संत नामदेव यांनी पंढरपूरच्या विठुरायाचे वर्णन करण्यासाठी ‘युगे अठ्‌ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा’! या ओळींचा वापर केला आहे. पंढरपुरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या तोंडून या ओळी ऐकायला मिळतात. दरवर्षी पहिल्या पावसासोबतच वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीचे वेध लागतात. आजवर अनेक चित्रपटांतून विठू माऊलीचे दर्शन तसेच माऊलींप्रती असलेल्या श्रध्देचे यथार्थ दर्शन करण्यात आले आहे. यंदाही टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर करत ‘डंका… हरीनामाचा’ वाजणार आणि गाजणार आहे. या ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Union Budget: यापेक्षा अंबानींचा आणखी एखादा लग्न सोहळा पाहिला असता; केंद्रीय अर्थसंकल्पावर हे काय बोलला अश्नीर ग्रोव्हर?

Premachi Goshta: हर्षवर्धनने मिहिकाला दिले गुंगीचे औषध, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताला कळताच काय होणार?

Union Budget 2024: देशाचं बजेट बघताना खिसाही तपासताय? बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी दिलीये पैसा कसा वापरावा याची शिकवण!

एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

चित्रपटाचे आकर्षक पोस्टर

‘डंका… हरीनामाचा’ या चित्रपटाच्या पोस्टरवर विठूरायच्या मूर्तीला लाल फडक्यामध्ये गुंडाळण्यात आले आहे. तसेच विठूरायाचा एक डोळा दिसत आहे. या पोस्टरवर डंका हरी नामाचा असे लिहिण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर हे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
वाचा: तुमच्या डोळ्यातल्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल! 'आम्ही जरांगे' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?

‘डंका… हरीनामाचा’ हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे. सयाजी शिंदे, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, अविनाश नारकर, किरण गायकवाड, रसिका सुनील, अक्षया गुरव, निखिल चव्हाण, मयूर पवार, किरण भालेराव, कबीर दुहान सिंग, महेश जाधव हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निर्माता रविंद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठूरायाला भक्तीभावाने समर्पित केला आहे.
वाचा: हे निराशाजनक आहे; 'ऑल आइज ऑन रफा' पोस्ट माधुरीने डिलिट करताच नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

‘डंका… हरीनामाचा’ हा मराठी चित्रपट १९ जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय. अमोल कागणे फिल्म्स, फिल्मास्त्र स्टुडिओजच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओज, अमेय खोपकर, अमोल कागणे, प्रणीत वायकर यांनी सांभाळली आहे. ‘डंका… हरीनामाचा’ चित्रपट मराठीतच नव्हे तर हिंदी, तेलगू , तामिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहाता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वजण चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
वाचा: नारीचा आत्मा काही वेगळ्याच कारणासाठी आला आहे; ‘अल्याड पल्याड'चा थरकाप उडवणारा ट्रेलर प्रदर्शित

विभाग

पुढील बातम्या