मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  संघर्ष बिगर काही खरं नसतं!; "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

संघर्ष बिगर काही खरं नसतं!; "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Jun 08, 2024, 11:17 AM IST

    • "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामधील "संघर्ष बिगर काही खरं नसतं" हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Amhi jarange trailer: आम्ही जरांगे ट्रेलर

"आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामधील "संघर्ष बिगर काही खरं नसतं" हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

    • "आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा" हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामधील "संघर्ष बिगर काही खरं नसतं" हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपटाचा ट्रेलर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Union Budget: यापेक्षा अंबानींचा आणखी एखादा लग्न सोहळा पाहिला असता; केंद्रीय अर्थसंकल्पावर हे काय बोलला अश्नीर ग्रोव्हर?

Premachi Goshta: हर्षवर्धनने मिहिकाला दिले गुंगीचे औषध, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताला कळताच काय होणार?

Union Budget 2024: देशाचं बजेट बघताना खिसाही तपासताय? बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी दिलीये पैसा कसा वापरावा याची शिकवण!

एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

काय आहे ट्रेलर?

“आम्ही जरांगे” या चित्रपटाच्या ट्रेलरमधील'गरजवंत मराठ्यांचा लढा हा आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचला आहे' हा डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तसेच मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचा संघर्ष दिग्दर्शकाने योग्य पद्धतीने चित्रीत केल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपटातील कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.
वाचा: अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

मागील शंभर वर्षापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या चळवळीसाठी झटलेले आणि आपल्या जीवाचे बलिदान देणारे मराठा क्रांतिवीर यांचा न पाहिलेला इतिहास पहिल्यांदाच चित्रपट रुपात रूपेरी पडद्यावर येत असल्याने प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीचं असणार आहे. खऱ्या आयुष्यात मराठ्यांचा साथ मिळवल्या नंतर आता आरक्षणाच्या चर्चेत असलेल्या मनोज जरांगे पाटील ह्यांना मोठ्या पडद्यावर सुद्धा प्रेक्षकांचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळेल ह्यात काही शंका नाही.
वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

कोणते कलाकार दिसणार?

“आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जुन २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मनोज जरांगे यांची भूमिका अभिनेते मकरंद देशपांडे साकारताय. तसेच अभिनेता प्रसाद ओकने अण्णासाहेब जावळे पाटील ह्यांची भूमिका साकारली आहे. इतकच नव्हे तर माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांची भूमिका अजय पुरकर साकारताय. सिनेमात इतर दिग्गज कलाकार जसे सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, भूषण पाटील, चिन्मय संत, अमृता धोंगडे, अंजली जोगळेकर, आरती त्रिमुखे, प्रेम नरसाळे ही महत्वाची भूमिका साकारत आहेत. आता चित्रपटाचा ट्रेलर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे. सर्वजण १४ जूनची वाट पाहात आहेत.
वाचा: कलाला कळाली आई-वडिलांची बिकट परिस्थिती, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आजच्या भागात काय घडणार?

विभाग

पुढील बातम्या