मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल 'रांगडा' अनुभव; कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार मोठ्या पडद्यावर दिसणार!

महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल 'रांगडा' अनुभव; कुस्ती अन् बैलगाडा शर्यतीचा थरार मोठ्या पडद्यावर दिसणार!

Jun 05, 2024, 11:25 AM IST

  • महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या मातीतला अस्सल 'रांगडा' अनुभव!

महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

  • महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. या दोन्ही खेळांनी अवघ्या महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घातली आहे. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव ‘रांगडा’ हा चित्रपट देणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट ५ जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Union Budget: यापेक्षा अंबानींचा आणखी एखादा लग्न सोहळा पाहिला असता; केंद्रीय अर्थसंकल्पावर हे काय बोलला अश्नीर ग्रोव्हर?

Premachi Goshta: हर्षवर्धनने मिहिकाला दिले गुंगीचे औषध, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताला कळताच काय होणार?

Union Budget 2024: देशाचं बजेट बघताना खिसाही तपासताय? बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी दिलीये पैसा कसा वापरावा याची शिकवण!

एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

मिळणार आहे. ‘रांगडा’ या चित्रपटात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा मराठीत आजवर काही चित्रपटांतून बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचं दर्शन झालं आहे. पण, याच दोन खेळांवर बेतलेली कथा ‘रांगडा’ या चित्रपटातून पाहायला असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे कथासूत्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे.

‘मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदुत्त्वाच्या विरोधात’; शरद पोंक्षे यांच्या फेसबुक पोस्टने वेधलं साऱ्यांचं लक्ष

कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू दिसणार मुख्य भूमिकेत!

सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकार कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील यात शंका नाही. त्यासाठी आता केवळ ५ जुलैपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे. भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे,अतिक मुजावर, संदीप (बापु)रासकर,राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद या कलाकारांच्या दमदार प्रमुख भूमिका आपल्याला चित्रपटात पहायला मिळणार आहेत.

फायर कपल!'श्रीवल्ली' रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनच्या डान्सच्या प्रेमात पडले चाहते!

शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे,राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी ‘रांगडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून, बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन, तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.

पुढील बातम्या