logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Premachi Goshta: हर्षवर्धनने मिहिकाला दिले गुंगीचे औषध, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताला कळताच काय होणार?

Premachi Goshta: हर्षवर्धनने मिहिकाला दिले गुंगीचे औषध, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताला कळताच काय होणार?

Aarti Vilas Borade HT Marathi

Published Jul 23, 2024 12:44 PM IST

google News
    • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत हर्षवर्धन गेल्या काही दिवसांपासून सावनीशी होणारे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्याने मिहिकाला मोहरा बनवला आहे.
premachi goshta

Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत हर्षवर्धन गेल्या काही दिवसांपासून सावनीशी होणारे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्याने मिहिकाला मोहरा बनवला आहे.

    • Premachi Goshta Update: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत हर्षवर्धन गेल्या काही दिवसांपासून सावनीशी होणारे लग्न मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्याने मिहिकाला मोहरा बनवला आहे.

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची धूम पाहायला मिळत आहे. हर्षवर्धनला हे लग्न करायचे नसले तरी तो सावनीला लग्नासाठी खूप उत्साही असल्याचे सांगत आहे. त्यासाठी तो सगळे प्रयत्न करत आहे. आता हर्षवर्धनने मुक्ताची बहिण मिहिकाला लग्न मोडण्यासाठी मोहरा बनवले आहे. चला जाणून घेऊया आजच्या मालिकेच्या भागात काय घडणार?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आजच्या भागाची सुरुवात ही मिहिरने होती. मिहिरने सावनीच्या लग्नाची पूर्ण जबाबदारी घेतली आहे. ही जबाबदारी पार पाडताना मिहिरची तारंबळ उडाली आहे. त्यात त्याला लकी मदत करत असतो. पण मिहिरची होणारी धावपळ पाहून सागरने त्याला स्वत:च्या लग्नाकडेही लक्ष दे असे सल्ला दिला आहे. आता मिहिर सावनीच्या लग्नाची कशी तयारी करतो हे पुढच्या भागात कळेल.

आदित्य जाणार असल्यामुळे कोळी कुटुंबीय झाले भावूक

सावनीचे लग्न झाल्यानंतर आदित्यला घेऊन ती हर्षवर्धनच्या घरी जाणार असल्यामुळे इंद्रा, स्वाती, लकी, सई सगळेजण भावूक झाले आहेत. सई आदित्यसाठी एक ग्रिटींग तयार करते. ते पाहून आदित्य खूश होतो. पण सईने त्यावर मुक्ताचे चित्र काढलेले पाहून त्याचा हिरमोड होतो. तेवढ्यात इंद्रा आदित्यसाठी बनवलेले लाडू घेऊन येते. तर स्वाती, लकी आदित्यला गिफ्ट देतात. ते पाहून आदि खूप खूश होतो.

सावनीने पाठवले सामान

हर्षवर्धनला सावनीने सही करुन घेतलेले पेपर परत हवे असतात. कारण त्याला हे लग्न मोडायचे असते. तो सावनीशी गोड बोलून तिला उगाच लग्नात धावपळ नको म्हणून अर्धे सामान आणि त्यासोबत ते सही केलेले पेपर पाठवून दे असे सांगतो. सावनीला देखील हर्षवर्धनचे बोलणे पटते आणि ती सामान पाठवते. मुक्ताला ते पाहून धक्का बसतो.
वाचा : अभिनेता आर. माधवन याची कमाल! व्यायामाशिवाय २१ दिवसांत कमी केलं वजन, असं काय केलं?

हर्षवर्धनने मिहिकाचा केला वापर

हर्षवर्धन सावनीसोबत लग्न करणार असतो त्यामुळे हॉल असलेल्या हॉटेलमध्ये हनीमून सूट बूक करतो. त्या सूटचे डेकोरेन मिहिकाला करायला सांगतो. मिहिका देखील आवडीने ते डेकोरेशन करायला जाते. हर्षवर्धन तिच्या कॉफीमध्ये काही तरी मिसळतो. मिहिकाला गुंगी येते. त्यानंतर हर्षवर्धन तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या शेजारी झोपतो. मुक्ता आणि सागर तेथे येतात. त्यांना धक्काच बसतो.