मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Zara Hatke Zara Bachke Review: कपिल आणि सौम्याच्या वादात प्रेक्षकांचं होणार मनोरंजन! कसा आहे ‘जरा हटके जरा बचके’?

Zara Hatke Zara Bachke Review: कपिल आणि सौम्याच्या वादात प्रेक्षकांचं होणार मनोरंजन! कसा आहे ‘जरा हटके जरा बचके’?

Jun 03, 2023, 12:06 PM IST

  • Zara Hatke Zara Bachke Movie Review: अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट नुकताच पेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Zara Hatke Zara Bachke Review

Zara Hatke Zara Bachke Movie Review: अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट नुकताच पेक्षकांच्या भेटीला आला आहे.

  • Zara Hatke Zara Bachke Movie Review: अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट नुकताच पेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Zara Hatke Zara Bachke Movie Review: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा ‘जरा बचके जरा हटके’ हा चित्रपट नुकताच पेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे. छोट्या शहरातील कथांच्या माध्यमातून दिग्दर्शक आणि लेखक लक्ष्मण उतेकर यांनी तरुणांच्या इच्छा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि विचारांचे चित्रण केले आहे. ‘लुका छुपी’ आणि ‘मिमी’नंतर, तो रोमँटिक कॉमेडी ‘जरा हटके जरा बचके’मधून एका छोट्या शहराची कथा घेऊन मोठ्या पडद्यावर परतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

‘जरा बचके जरा हटके’ या चित्रपटाची कथा इंदूरमध्ये घडताना दाखवली आहे. योगा प्रशिक्षक कपिल दुबे (विकी कौशल) आणि सौम्या चावला-दुबे (सारा अली खान) यांचा प्रेमविवाह झाला आहे. सौम्याचे सासू आणि सासरे यांच्याशी चांगले संबंध आहेत. मात्र, त्यांच्या या चौकोनी कुटुंबात काका (नीरज सूद), मामी (कनुप्रिया पंडित) आणि त्यांचा मुलगा कपिलच्या घरी येऊन राहतात. कपिल आणि सौम्याने त्यांना त्यांची खोली राहायला दिली आहे. मात्र, आता ते स्वतःच्या घरी परत जाण्याचे नावच घेत नाहीत. इथून सुरू होते त्यांच्या त्रासाची कहाणी...

Vat Purnima: बॉलिवूडचे सत्यवान-सावित्री! अमिताभ हॉस्पिटलमध्ये असताना जया बच्चन वाचत होत्या हनुमान चालीसा

छोटं घर आणि प्रायव्हसी मिळत नसल्यामुळे सौम्या कपिलवर वेगळं घर घेण्यासाठी दबाव टाकते. मुलखाचा कंजूस असलेला कपिल तिच्या या निर्णयाला होकार देतो. रिअल इस्टेट एजंटला भेटल्यानंतर, त्यांना समजते की घर खरेदी करणे आता अतिशय महाग झाले आहे. दरम्यान, सौम्याला सरकारच्या जन आवास योजनेची माहिती मिळते. या योजनेत गरीब आणि गरजूंना कमी किंमतीत पक्की घरे दिली जातात. पण, त्यासाठी काही अटी आहेत. घराच्या फायद्यासाठी, सौम्या कागदावर दाखवण्यासाठी कपिलला घटस्फोट देते. आता लाच देण्यासाठी कपिल आणि सौम्या आपले दागिने विकून आणि कर्ज घेऊन चार लाख रुपये गोळा करतात. मात्र, काही त्रुटींमुळे ही यादी जाहीर केली जात नाही, तेव्हा दोघांनाही धक्का बसतो. या दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि त्यांच्या नात्यात दुरावा येऊन लागतो आणि चित्रपटाची कथा पुढे सरकते.

कसा आहे एकूण चित्रपट?

या चित्रपटाचा पूर्वार्ध त्याच्या गतीने पुढे सरकतो, पण उत्तरार्धात कथा ताणली गेली आहे. या कथेत विनोद आणि इतरही अनेक भाव बघायला मिळतात. क्लायमॅक्समध्ये कथा जराशी गडबडलेली वाटते. संगीत हा चित्रपटाचा एक सुखद पैलू आहे. सचिन-जिगरच्या संगीताने काही गाणी चांगली झाली आहेत. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे तर, विकी कौशलने एका छोट्या शहरातील पैसे वाचवणाऱ्याची व्यक्तीची भूमिका साकारली आहे. इंदूरची बोलीही त्यांनी अचूक पकडली आहे. तो कॉमिक सीनमध्ये मनोरंजन करतो आणि भावनिक सीनमध्येही प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

सारासोबतची विकीची केमिस्ट्री चांगली जुळली आहे. सारा अली खान तिच्या भूमिकेत शोभून दिसली आहे. मात्र, यात तिने तिच्या संवादांवर विशेष लक्ष देणे गरजेचे होते. सहाय्यक पात्रांमध्ये, मामीची भूमिका करणारी कनुप्रिया पंडित लक्ष वेधून घेते. इन्स्पेक्टरच्या भूमिकेत शारीब हाश्मी आणि स्टेट एजंट भगवान दासच्या भूमिकेत इनाम उलहक लक्षात राहतात. चित्रपटातील इतर कलाकारांचा अभिनयही चांगला झाला आहे. सारा आणि विकीचा हा चित्रपट फॅमिली ड्रामा असल्याने संपूर्ण कुटुंबासोबत याचा आनंद घेता येऊ शकतो.

कलाकार: विक्‍की कौशल, सारा अली खान, इनाम उलहक, शारिब हाशमी, राकेश बेदी, नीरज सूद, कनुप्रिया पंडित

दिग्दर्शक: लक्ष्मण उतेकर

स्‍टार: २.५

पुढील बातम्या