मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही; "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील"चा ट्रेलर प्रदर्शित
May 31, 2024, 03:50 PM IST
- "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेलरमधील 'मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही' हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
"संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेलरमधील 'मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही' हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
- "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ट्रेलरमधील 'मावळ्याच्या घोड्याचा आणि कुणब्याच्या बैलजोड्याचा नाद करायचा नाही' हा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची जीवनकहाणी असलेला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
"संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटाच्या २ मिनिटे २५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्ष दाखवण्यात आला आहे. एक मराठा कोट मराठा अशी साद अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली असून , लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलेच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजत , असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे , संघर्षयोद्धा या चित्रपटाचा ट्रेलर बघून समाजात आनंदाचे वातावरण होत आहे , या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच ट्रेलरही वादळी आणि तुफान आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास पाहाण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
वाचा: अमोलमुळे अप्पी आणि अर्जुन पुन्हा एकत्र येणार? 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत मोठा ट्विस्ट
कोणते कलाकार दिसणार?
"संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती सोनाई फिल्मसने केली आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वाचा: 'इंडियाज बेस्ट डान्सर ४'साठी ऑडिशन द्यायची आहे? मग जाणून घ्या कधी आणि कुठे होणार
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते ट्रेलरचे अनावरण
मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Aavesham Review: एका गँगस्टरसोबतची मैत्री! जाणून घ्या काय आहे 'आवेशम' सिनेमाची कथा
विभाग