Jun 03, 2023, 09:53 AM IST
Tiger 3 set Leaked Video: ‘पठाण’मध्ये ज्याप्रकारे सलमान खानची दमदार भूमिका दिसली होती, त्याचप्रकारे शाहरुख खान ‘टायगर ३’मध्ये पाहायला मिळणार आहे.
Tiger 3 set Leaked Video: ‘टायगर ३’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या सेटवरून शाहरुख खान आणि सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘टायगर ३’च्या सेटवर अॅक्शन सीनसाठी जाताना सलमान खान आणि शाहरुख खानचा लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता दुप्पट झाली आहे. सलमान खानच्या स्पाय थ्रिलर चित्रपटात शाहरुख खान कॅमिओ करताना दिसणार आहे. पठाणमध्ये ज्याप्रकारे सलमान खानची दमदार भूमिका दिसली होती, त्याचप्रकारे शाहरुख खान ‘टायगर ३’मध्ये पाहायला मिळणार आहे.
Chandramukhi 2: पडद्यावर पहिल्यांदाच पाहायला मिळणार कंगना रनौतचा हॉरर अवतार; पाहा जबरदस्त ट्रेलर!
Rajesh Khattar Birthday: अभिनेताच नव्हे तर हॉलिवूड कलाकारांचा आवाजही! शाहिद कपूरच्या सावत्र वडिलांबद्दल माहितीय?
Nava Gadi Nava Rajya: चिंगीची बहीण येणार अन् हौदोस घालणार? ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेत नवं वळण
Sara Kahi Tichyasathi: उमा मावशी बनणार ओवीची आई; लेकीला समजवणार कोकणातील सणांचं महत्त्व!
‘टायगर ३’च्या सेटवरील या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रथम सलमान खान आणि नंतर शाहरुख खान दिसत आहेत. लांब केस आणि हलकी दाढी असलेला शाहरुख खान अगदी ‘पठाण’ लूकमध्ये दिसत आहे. शाहरुख खान याने तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाच्या कार्गो पॅन्ट परिधान केली असून, त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमांची एक झलक व्हिडीओमध्ये दिसत आहे. दुसरीकडे, सलमान खान देखील तपकिरी रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घालून दबंग स्टाईलमध्ये चालत येताना दिसत आहे. सलमान खान आणि शाहरुख खानचा हा व्हिडीओ नीली खान नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे.
सलमान खान आणि कतरिना कैफ मुव्हीजचा स्पाय थ्रिलर चित्रपट ‘टायगर ३’ यावर्षी दिवाळीमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही. ‘टायगर ३’ हा चित्रपट हिंदी सोबतच तमिळ, तेलुगूमध्येही रिलीज होणार आहे. यशराज बॅनरखाली बनत असलेल्या ‘टायगर’ फ्रँचायझीच्या या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.