मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  The Entrepreneur: 'द आंत्रप्रेन्युअर', तुळजापूरमधील मराठी माध्यमातील मुलाची अविश्वसनीय कहाणी

The Entrepreneur: 'द आंत्रप्रेन्युअर', तुळजापूरमधील मराठी माध्यमातील मुलाची अविश्वसनीय कहाणी

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 31, 2023, 01:59 PM IST

    • The Entrepreneur Documentary: मराठी मनोरंजन जागतिक स्तरावर नेण्याचा एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीक शेलारचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.
The Entrepreneur Documentary
The Entrepreneur Documentary (HT)

The Entrepreneur Documentary: मराठी मनोरंजन जागतिक स्तरावर नेण्याचा एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीक शेलारचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

    • The Entrepreneur Documentary: मराठी मनोरंजन जागतिक स्तरावर नेण्याचा एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीक शेलारचा प्रयत्न यशस्वी झाला आहे.

अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलारची 'द आंत्रप्रेन्युअर' हे त्याचे एक उदाहरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Urofi Javed: इंस्टाग्रामने उर्फी जावेदला दिला झटका; अभिनेत्रीचं अकाऊंट झालं निलंबित! कारण काय?

Chhapa Kata: प्रेक्षकांनाही भुरळ पडणार; आदर्श शिंदेच्या आवाजात 'छापा काटा' रंगणार!

Boycott TMKOC: 'तारक मेहता... मालिका बंद करा'; चाहत्यांचा संताप झाला अनावर! नेमकं कारण काय?

Dinesh Phadnis: 'सीआयडी' फेम अभिनेत्याला आला हार्ट अटॅक; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या..

तुळजापूरमधील एका छोट्या गावातील मुलगा ते लंडनमधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक भारतीय उद्योजग हा प्रवास प्रतीकसाठी नक्कीच सोप्पा नव्हता. त्याचा हा संघर्षमयी प्रवास आपल्याला 'द आंत्रप्रेन्युअर' या माहितीपटात पाहायला मिळणार आहे. प्रतीकने भारतातील एका छोट्या शहरात सामान्य जीवन जगताना विलक्षण यश मिळविण्याचे स्वप्न कसे पाहिले आणि या एका स्वप्नाने त्याला यश आणि आत्म-शोधाच्या मार्गावर कसे नेले, याची कथा कथन केली आहे. युट्युबवर सात भागांत उपलब्ध असलेला हा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रातील तुळजापूर या पवित्र शहरात १९८८ साली जन्मलेल्या प्रतीकला लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची, चित्रपटांची आवड होती. त्यांची ही आवड एक उद्योजक म्हणून त्याच्या भविष्याचा मार्ग मोकळा करेल, हे त्याच्या पालकांच्या ध्यानीमनीही नव्हते. एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीकचे वडील प्रवीण नानासाहेब शेलार जे तुळजापूर आणि उस्मानाबाद नगरपरिषदमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते. प्रतीकच्या वडिलांची इच्छा होती की त्याने आयआयटी मधून पदवीधर व्हावे आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर बनावे. परंतू, प्रतीकची यशस्वी जीवनाची कल्पना केवळ त्यांच्या कुटुंबापुरती, शहर किंवा समाजापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांना आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे यश संपादन करायचे होते.

आपल्या या प्रवासाबद्दल प्रतीक शेलार म्हणतात, '' हा प्रवास खूप आव्हानात्मक होता. अनेक चढउतार होते, मात्र या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी मला अनेकांची मदत लाभली. माझे कुटुंबीय, मित्रपरिवार, माझ्यावर विश्वास दाखवणारे माझे सहकारी या सगळ्यांनीच मला सहकार्य केले. इच्छाशक्ती असेल तिथे काहीच अशक्य नाही. अनेक आव्हानांना पेलण्याचे सामर्थ्य तुमच्याकडे आपसूकच येते. मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो, आयुष्यात अशक्य काही नाही. फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा, मेहनतीची तयारी हवी आणि कधीही न्यूनगंड बाळगू नये. कायम जिद्द बाळगावी, हेच सांगण्याचा प्रयत्न मी 'द आंत्रप्रेन्युअर' या माहितीपटातून केला आहे. मी केलेल्या चुका, मला आलेले वाईट अनुभव, त्यातून मी काय शिकलो हे सांगण्याचा प्रयत्न मी या माहितीपटातून केला आहे.''

विभाग