Phullwanti Song: प्राजक्ता माळीचा कधी न पाहिलेला लूक, ‘फुलवंती' सिनेमातील गाणे प्रदर्शित
Sep 12, 2024, 11:34 AM IST
- Phullwanti: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘फुलवंती' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले असून प्राजक्ताचा कधी न पाहिलेला लूक समोर आला आहे.
Phullwanti: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘फुलवंती' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले असून प्राजक्ताचा कधी न पाहिलेला लूक समोर आला आहे.
- Phullwanti: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी महत्त्वाच्या भूमिकेत असणारा ‘फुलवंती' हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले असून प्राजक्ताचा कधी न पाहिलेला लूक समोर आला आहे.
पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत असे, ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती’चे अस्मानी सौंदर्य आणि आणि मनमोहक नृत्याने सर्वांची मने जिंकली होती. आता याच सगळ्याचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ चित्रपटातील एका गाण्यातून होणार आहे. "पुनवेच्या तारांगणी शुक्राची मी चांदणी लखलखत्या तेजाची, झगमगत्या रूपाची.... रंभा जणू मी देखणी” असे म्हणत आपल्या मनमोहक अदाकारीने आणि नृत्याने सर्वांना भुरळ पाडायला ‘फुलवंती’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसत आहे.
काय आहे गाणे?
‘फुलवंती' शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे. नुकताच या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे चित्रपटाचे शिर्षक गीत आहे. या गाण्यात प्राजक्ता माळीचा डान्स पाहण्यासारखा आहे. तसेच प्राजक्ताचे सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. गाण्यातील भव्य-दिव्य दिसणारा सेट, लाईट्स सर्वकाही प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.
शिर्षकगीताविषयी
‘फुलवंती' या चित्रपटाचे नुकताच प्रदर्शित झालेले शिर्षकगीत हे गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे यांनी लिहिले आहे. आर्या आंबेकरने हे गाणे गायले असून गीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी हे गाणे संगीतबद्ध केलेले आहे. तसेच उमेश जाधव यांचे नृत्य दिग्दर्शन आणि प्राजक्ता माळीची ‘फुलवंती'च्या रूपातील अदाकारी यांनी या शीर्षकगीताला चारचांद लावले आहेत.
वाचा: विकास सेठीच्या पत्नीने शेअर केला अभिनेत्याचा जुना व्हिडिओ, पाहून डोळ्यात येतील अश्रू
चित्रपटाविषयी जाणून घ्या
‘फुलवंती' हा चित्रपट ११ ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.