मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gulaabi: स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग! मृणाल कुलकर्णीच्या 'गुलाबी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Gulaabi: स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग! मृणाल कुलकर्णीच्या 'गुलाबी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 16, 2024, 12:19 PM IST

    • Upcoming Marathi Movie Gulaabi: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येता आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.
Mrunal Kulkarni

Upcoming Marathi Movie Gulaabi: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येता आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.

    • Upcoming Marathi Movie Gulaabi: अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येता आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. हे चित्रपट प्रेक्षकांच्या देखील विशेष पसंतीला उतरताना दिसत आहेत. अभिनेत्री आणि निर्माती मृणाल कुलकर्णीदेखील हटके विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. नुकताच मृणालने तिच्या आगामी चित्रपटाची 'गुलाबी'ची घोषणा केली आहे. सोबतच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे. त्यामुळे चित्रपटात काहीतरी वेगळी गोष्ट पाहायला मिळणार याबाबत चर्चा सुरु आहे. तसेच चित्रपटाचा टीझर पाहाता प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

काय आहे चित्रपटाचा टीझर

'गुलाबी' चित्रपटाचा एक पोस्टर टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये तीन मैत्रीणी दाखवण्यात आल्या आहेत. श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख २२ नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही 'गुलाबी' चित्रपटगृहात पाहाता येईल.

कोणते कलाकार दिसणार?

नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. 'गुलाबी' चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

दिग्दर्शकाने व्यक्त केल्या चित्रपटाविषयी भाव

"आज गणपती बाप्पाच्या प्रसन्न वातावरणात 'गुलाबी' चित्रपटाची तारीख जाहीर केली आहे. गुलाबी या नावावरून सिनेमा स्त्रीप्रधान असला, तरी त्यात मनोरंजनही तितकेच आढळून येईल. हळूहळू चित्रपटातील अनेक गोष्टी समोर येतील. 'गुलाबी' हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर तो विचार, वागणूक, स्वप्न आणि नाती यांचा एक सुंदर गुलाबी प्रवास आहे, जो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अनुभवांशी जोडलेला आहे. या चित्रपटात आम्ही स्त्रीच्या भावविश्वाची, संघर्षाची आणि यशाची गाथा मांडली आहे. हा चित्रपट प्रत्येकाला स्वतःची ओळख आणि स्वप्ने पुन्हा नव्याने जगायला प्रेरित करेल. प्रेक्षकांना त्यांच्याशी निगडित असलेल्या भावना या चित्रपटातून नक्कीच अनुभवता येतील" असे दिग्दर्शकअभ्यंग कुवळेकर यांनी सांगितले आहे.

विभाग

पुढील बातम्या
नोटिफिकेशन सेंटर