मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; 'एक डाव भुताचा' सिनेमाचा टीझर आला!

गुलाब तिला देण्याआधीच तुटला, पुढं मुलं-बाळं होतील की नाही?; 'एक डाव भुताचा' सिनेमाचा टीझर आला!

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 13, 2024, 01:10 PM IST

    • Ek Daav Bhootacha Teaser: "एक डाव भुताचा" या बहुचर्चित चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.
Ek Daav Bhootacha

Ek Daav Bhootacha Teaser: "एक डाव भुताचा" या बहुचर्चित चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

    • Ek Daav Bhootacha Teaser: "एक डाव भुताचा" या बहुचर्चित चित्रपटात मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

Ek Daav Bhootacha Teaser: आपल्या विनोदी शैलीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज या चारही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. त्यांची हसण्याची विशिष्ट पद्धत ही प्रेक्षकांना खूप आवडते. आता मकरंद अनासपुरे हे "एक डाव भुताचा" या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे चित्रपटाचा टीझर?

"एक डाव भुताचा" या चित्रपटात स्मशानात जन्म झालेल्या सिद्धार्थ जाधवची कथा दाखवण्यात येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सिद्धार्थला गावात असणारी भूतं दिसत आहेत. त्या भूतांची शेवटची इच्छा तो पूर्ण करत असतो. या इच्छा पूर्ण करत असताना सिद्धार्थ एका मुलीच्या प्रेमात पडतो. ही मुलगी अप्सरा असते. आता चित्रपटात पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे. तसेच मकरंद अनासपुरे यांचे डबल अर्थ असणारे संवाद हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची कथा "एक डाव भुताचा" या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधवनं निभावली आहे, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे. त्यामुळे मनोरंजक कथानक, सकस अभिनय असलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले, अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते, रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. हा चित्रपट ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या
नोटिफिकेशन सेंटर