KBC 16 : अवघ्या ११ वर्षांचा अर्जुन लखपती बनला; बिस्कीटाशी संबंधित प्रश्नावर अडकला! तुम्हाला माहितीय का उत्तर?
Nov 05, 2024, 02:23 PM IST
Kaun Banega Crorepati Season 16: अर्जुन अग्रवाल हा 'केबीसी १६ ज्युनिअर'चा पहिला हॉट सीट कंटेस्टंट बनला. फास्टर फिंगर फर्स्ट स्पर्धेत सर्वात कमी वेळेत उत्तर देऊन त्याने हॉट सीटवर जागा मिळवली.
Kaun Banega Crorepati Season 16:अर्जुन अग्रवाल हा'केबीसी १६ ज्युनिअर'चा पहिला हॉट सीट कंटेस्टंट बनला. फास्टर फिंगर फर्स्ट स्पर्धेत सर्वात कमी वेळेत उत्तर देऊन त्याने हॉट सीटवर जागा मिळवली.
Kaun Banega Crorepati Season 16: अर्जुन अग्रवाल हा 'केबीसी १६ ज्युनिअर'चा पहिला हॉट सीट कंटेस्टंट बनला. फास्टर फिंगर फर्स्ट स्पर्धेत सर्वात कमी वेळेत उत्तर देऊन त्याने हॉट सीटवर जागा मिळवली.
Kaun Banega Crorepati Season 16 : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध क्वीझ शो ‘कौन बनेगा करोड़पती १६’ आता नवीन रूपात दाखल झाला आहे. ‘केबीसी १६ ज्युनिअर’ अशा नावाने हा शो ४ नोव्हेंबरपासून छोट्या स्पर्धकांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा खास शो सुरू होताच सगळ्यांना आवडला आहे. या शोमध्ये ९ ते १२ वर्षे वयोगटातील १० बालकं सहभागी झाली आहेत. यामध्ये छत्तीसगडच्या अर्जुन अग्रवालने हॉट सीटवर बसून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अर्जुन अग्रवाल हा 'केबीसी १६ ज्युनिअर'चा पहिला हॉट सीट कंटेस्टंट बनला. फास्टर फिंगर फर्स्ट स्पर्धेत सर्वात कमी वेळेत उत्तर देऊन त्याने हॉट सीटवर जागा मिळवली. अर्जुनने खेळातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपल्या ज्ञानाने केवळ कुटुंबाला नाही, तर संपूर्ण देशाला गर्वित केलं. त्याचं आत्मविश्वास आणि बुद्धिमत्ता यामुळे प्रेक्षकांचं मन जिंकण्यात त्याला यश मिळालं आहे. मात्र, एका प्रश्नाचं उत्तर त्याला देता आलं नाही. शोच्या १३व्या प्रश्नावर अर्जुन थांबला. कारण त्याला प्रश्नाचे योग्य उत्तर माहीत नव्हतं. काय होता हा प्रश्न? तुम्हला येतं का याचं उत्तर?
प्रश्न : मारी बिस्किटचं नाव कोणत्या देशाच्या शाही व्यक्तीच्या नावावर ठेवले गेले आहे?
उत्तरासाठी चार पर्याय होते:
ए. इटली
बी. रूस
सी. मोनाको
डी. फ्रांस
या प्रश्नाला अर्जुनने ‘ए. इटली’ हे उत्तर दिले. परंतु त्याचे हे उत्तर चुकीचे ठरले. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते ‘बी. रूस’. यानंतर अर्जुन खेळातून बाहेर पडला. मात्र, त्याने आपल्या बुद्धीने सगळ्यांची मने जिंकून घेतली.
KBC 16 : मुलीच्या भविष्यासाठी खेळणाऱ्या रश्मीला एका प्रश्नानं थांबवलं; ६.४० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीय?
अर्जुनला मिळालं विशेष इनाम
अर्जुनने हॉट सीटवर बसताच त्याला अमिताभ बच्चन यांनी ‘कल्याण भव:’ आशिर्वाद दिला. यासोबतच त्याला एक सोन्याचं नाणं भेट म्हणून मिळालं. या शोमध्ये त्याने १२ लाख ५० हजार रुपये जिंकले. त्याला गेमच्या शेवटी एटमबर्ग कडून एक पंखा आणि अल्ट्रा टेककडून एक खास भेट मिळाली. ‘केबीसी १६’च्या टीमकडून त्याला एक मेडल देखील देण्यात आले.
अर्जुन जिंकलेल्या पैशांचं काय करणार?
अर्जुनच्या उत्तम व्यक्तिमत्वाचे आणखी एक उदाहरण या मंचावर पाहायला मिळालं आहे. अमिताभ बच्चन यांनी त्याला विचारलं की, ‘तू जिंकलेली रक्कमेतून बहिणीला किती पैसे देणार?’ यावर अर्जुनने खूपच सुंदर उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘जितके ती मागेल.’ त्याने पुढे म्हटलं की, ‘ते सर्व पैसे मी माझ्या आई-वडिलांना देईन, पण बहिणीसाठी तिचं आवडतं गिफ्ट घेईन.’ अमिताभ बच्चन हे उत्तर ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांना अर्जुनला कौतुकाची थाप दिली.
सौर मंडळावरील प्रश्नाने अर्जुनला मिळवून दिलं मोठं इनाम
अर्जुनने ‘केबीसी’मध्ये १२ लाख ५० हजार रुपये जिंकण्यासाठी ज्या प्रश्नाचे उत्तर दिले होते, तो प्रश्न होता की, ‘आपल्या सौर मंडळाच्या एकूण द्रव्यमानाचा किती टक्का सूर्याच्या भागात आहे?’
याचे पर्याय होते:
ए. ५० टक्के
बी. ७५ टक्के
सी. ५० टक्क्यापेक्षा कमी
डी. ९९ टक्क्यापेक्षा जास्त
अर्जुनने या प्रश्नाचं योग्य उत्तर देत पर्याय ‘डी. ९९ टक्क्यापेक्षा जास्त’ निवडला. यामुळे त्याला १२.५ लाख जिंकता आले.