logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 16: सर्वसामान्यांना आवडणारा 'हा' खाद्यपदार्थ अमिताभ बच्चन यांच्या आवडीचा, केबीसीमध्ये केला खुलासा

KBC 16: सर्वसामान्यांना आवडणारा 'हा' खाद्यपदार्थ अमिताभ बच्चन यांच्या आवडीचा, केबीसीमध्ये केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 21, 2024, 03:43 PM IST

google News
    • Kaun Banega Crorepati 16 : कौन बनेगा करोडपती या शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन हे खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यांनी त्यांचा आवडता खाद्य पदार्थ सांगितला आहे.
amitabh bachchan

Kaun Banega Crorepati 16 : कौन बनेगा करोडपती या शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन हे खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यांनी त्यांचा आवडता खाद्य पदार्थ सांगितला आहे.

    • Kaun Banega Crorepati 16 : कौन बनेगा करोडपती या शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन हे खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यांनी त्यांचा आवडता खाद्य पदार्थ सांगितला आहे.

छोट्या पडद्यावरील क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' कायमच चर्चेत असतो. या क्विझ शोचा सोळावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करताना दिसतात. शोमध्ये हजेरी लावणारे स्पर्धक आणि बिग बी यांच्यामधील संवाद हे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. अमिताभ बच्चन या स्पर्धकांशी गप्पा मारताना खासगी आयुष्याविषयी देखली बोलताना दिसतात. या शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन त्यांना आवडणाऱ्या खाद्यपदार्थाविषयी बोलताना दिसणार आहेत.

स्पर्धकाने विचारला प्रश्न

टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६व्या सिझनने प्रेक्षकांवर आपली मजबूत पकड ठेवली आहे. ज्याचे कारण आहे हा शो होस्ट करणारे अमिताभ बच्चन. शोमध्ये भावना आणि बुद्धी यांच्यात साधलेले सुंदर संतुलन आहे. स्पर्धकांच्या भावुक करणाऱ्या कथा, या खेळातील बौद्धिक थरार आणि बच्चन यांचे मोहक सूत्रसंचालन यामुळे समस्त देशाचा हा आवडता शो बनला आहे. आगामी भागात, गुजरातमध्ये राहणारी आर्ट्स आणि क्राफ्ट्स तसेच संगीत शिक्षिका हर्षा उपाध्याय हॉट सीटवर विराजमान झालेली दिसेल. तिचा शिकवण्याचा ध्यास आणि चिकाटीने केलेला प्रवास तुम्हाला नक्कीच प्रेरणा देऊन जाईल.

कोणता पदार्थ बिग बींना आवडतो?

हर्षा उपाध्याय हॉट सीटवर बसून बिग बींशी छान गप्पा मारत होती. ती बुद्धीमत्तेच्या जोरावर चांगला खेळ खेळत होती. एका अन्नाशी संबंधित प्रश्नांनंतर हलक्या-फुलक्या गप्पा मारताना हर्षा उपाध्यायने अमिताभ बच्चन यांना विचारले की त्यांना चुरमा आवडतो का? त्यावर अमिताभ यांनी गालात हसत उत्तर दिले की, कदाचित सगळे पदार्थ त्यांना माहीत नसतील, पण एक पदार्थ आहे जो त्यांना अत्यंत प्रिय आहे. वडा पाव!
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ

बिग बी म्हणाले, “त्याच्यापेक्षा चांगली दुसरी कोणतीच गोष्ट नाही. छोटासा असतो, पण काय छान लागतो.. सगळीकडे मिळतो.. फक्त देशातच नाही, विदेशातही.” या गंमतीदार संभाषणाने प्रेक्षकांना खूप हसवले. बिग बींना सर्वसामान्यांना आवडणारा वडापाव आवडतो हे ऐकून सर्वांना आनंद झाला.

पुढील बातम्या