Aishwarya Rai divorce : खरंच अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट झाला? अमिताभ बच्चन यांच्या बर्थडे व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!
Published Oct 14, 2024 12:33 PM IST
Aishwarya Rai Divorce : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट पाहून काही लोकांना वाटलं की, कुटुंबात सर्व काही ठीक आहे. मात्र, नंतर एक असा व्हिडीओ समोर आला, ज्याने सगळ्यावर पाणी फिरलं.
Aishwarya Rai Divorce : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट पाहून काही लोकांना वाटलं की, कुटुंबात सर्व काही ठीक आहे. मात्र, नंतर एक असा व्हिडीओ समोर आला, ज्याने सगळ्यावर पाणी फिरलं.
Aishwarya Rai Divorce : अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट पाहून काही लोकांना वाटलं की, कुटुंबात सर्व काही ठीक आहे. मात्र, नंतर एक असा व्हिडीओ समोर आला, ज्याने सगळ्यावर पाणी फिरलं.
Aishwarya Rai And Abhishek Bachchan Divorce : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. हे वृत्त खोटे निघावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. मात्र, सोशल मीडियावर सतत काही ना काही येत राहते, त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत येते. नुकतीच अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याची पोस्ट आणि केबीसीमध्ये दाखवण्यात आलेला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस स्पेशल व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. या क्लिपमध्ये बिग बींसाठी सर्वांचा मेसेज होता. पण, ऐश्वर्या राय यात दिसली नाही, ज्यावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त केबीसीमध्ये एक खास एपिसोड दाखवला जातो. या आधी यात ऐश्वर्या दिसली की नाही, याकडे लोकांनी विशेष लक्ष दिले नाही. पण, यावेळी लोक ऐश्वर्याला खूपच मिस करत आहेत. ऐश्वर्या संदर्भातील ही पोस्ट रेडिटवर पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी आराध्यासोबत अमिताभ बच्चन यांचा फोटो टाकून स्वत:च्या आणि आराध्याच्या वतीने ‘बिग बीं’ना शुभेच्छा दिल्या आहेत.
Aishwarya Rai Divorce: 'या' अभिनेत्रीसाठी अभिषेक बच्चनने फसवले ऐश्वर्या रायला?
लोकांना आली बच्चन कुटुंबाच्या सूनेची आठवण!
ऐश्वर्याच्या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. यावर एका युजरने कमेंट केली आहे, ‘कुणी केबीसीचा एपिसोड पाहिला होता का? ऐश्वर्या आणि अभिषेक दोघांच्या विभक्त होण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने त्यांना शुभेच्छा दिल्याचा एकही व्हिडीओ नव्हता.’ आणखी एकाने लिहिले की, ‘होय, मलाही तसेच वाटत आहे. ही एक मोठी गोष्ट आहे. जर दोघांमध्ये सर्व काही ठीक असतं, तर त्यांनी त्यांच्या सुनेला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवलं नसतं. पण, मला वाटतं की, यामागे जया देखील असू शकतात.’
आणखी एकाने लिहिलं की, ‘आज केबीसीमध्ये सिद्ध झालं आहे. ऐश्वर्या वगळता सर्वांची झलक पाहायला मिळाली. त्यात नव्या आणि आराध्या देखील बोलताना दिसत होत्या. पण, आराध्याची इमेज काही सेकंदाची होती. तर, ऐश्वर्याचे नाव गाव देखील नव्हते.’ आणखी एक कमेंट अशी आहे, ‘कदाचित घरच्यांचा यात काही दोष नसावा, फक्त अभिषेकमुळेच हे घडत असावं.’ ऐश्वर्याच्या पोस्टवर काही लोकांनी असंही लिहिलं आहे की, जे लोक कुटुंबात भांडण आणि घटस्फोटाबद्दल बोलत होते त्यांनी आता शांत राहावं. सगळं काही छान सुरू आहे.