Viral News : टिकटॉकवर ‘तसले’ व्हिडिओ झाले लीक; हैराण झालेल्या इमशा रेहमान सोशल मीडियाच केलं बंद!
Nov 13, 2024, 01:59 PM IST
Imsha Rehman deactivates social media : पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे.
Imsha Rehman deactivates social media : पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे.
Imsha Rehman deactivates social media : पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे.
Who Is Imsha Rehman: पाकिस्तानी टिकटॉक स्टार इमशा रेहमानने तिचे अश्लील व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे. ही तरुण टिकटॉकर डेटा चोरीची शिकार झाली आहे, ज्यामुळे तिचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले आहेत. स्थानिक रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप, एक्स आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रेहमान एका मित्रासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली. यामुळे अखेर रेहमानने तिचे सोशल मीडिया अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचे खासगी व्हिडिओ ऑनलाईन लीक झाले आहेत. याआधी टिकटॉक स्टार मिनाहिल मलिक हिचेही खासगी व्हिडिओ ऑनलाईन लीक झाले होते.
कोण आहे इमशा रेहमान?
इमशा रेहमान ही मूळची पाकिस्तानची आहे. २२ वर्षीय इमशा रेहमान जन्म उत्तर पाकिस्तान भागात झाला. ती बऱ्याच काळापासून पाकिस्तानची लोकप्रिय सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही, तर टिकटॉकच्या माध्यमातून तिने लोकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. इन्स्टाग्राम आणि टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या अप्रतिम कंटेंटमुळे इमशा रेहमान चाहत्यांना आवडते. तिच्या व्हिडिओंमध्ये ती ब्युटी टिप्स, दैनंदिन जीवन आणि फॅशनशी संबंधित माहिती देत असते. टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या करोडोंच्या घरात आहे. मात्र सध्या व्हायरल झालेल्या लीक व्हिडिओमुळे इमशा रेहमानचे नाव चर्चेचा विषय बनले आहे.
Viral News : पाकिस्तानची टिकटॉक स्टार मिनाहिल मलिकचा प्राइवेट व्हिडिओ सोशल मिडियावर झाला वायरल; नेटकरी म्हणाले…
इमशा रेहमानची प्रतिक्रिया
वाढत्या टीकेनंतर रेहमानने तिचे इन्स्टाग्राम आणि टिकटॉक अकाऊंट डिअॅक्टिव्हेट केले आहे. लोकांच्या नजरेत राहण्याच्या दडपणाबद्दल बोलताना ती म्हणाली की, ‘खूपच वाईट वाटत आहे. एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर माझ्या खाजगी व्हिडिओंचे स्क्रीनशॉट हजारो वेळा शेअर आणि रीपोस्ट केले गेले आहेत, काही इंटरनेट वापरकर्त्यांसाठी मी मीम कंटेंट बनले आहे.’ इमशा रेहमानचे व्हिडिओ ऑनलाइन कसे लीक झाले, हे अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.
याआधी पाकिस्तानी टिकटॉकर मिनाहिल मलिकनेही तिचे अश्लील व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिल्यानंतर तिच्यावर झालेल्या टीकेमुळे सोशल मीडिया वापरणे बंद केले. ती म्हणाली की, 'माझ्यासाठी हे सोपं नव्हतं, पण मी आता ते केलं आहे. निरोप घेणं अवघड आहे. भांडण नाही, प्रेम पसरवा. मी निरोप घेत आहे. पण मला तुमची आठवण येईल. काळजी घ्या,' असं मिनाहिलने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
विभाग