logo
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranveer Singh Birthday: लेखक म्हणून सुरुवात करणारा रणवीर सिंह अभिनेता कसा बनला? वाचा...

Ranveer Singh Birthday: लेखक म्हणून सुरुवात करणारा रणवीर सिंह अभिनेता कसा बनला? वाचा...

Jul 06, 2023, 08:27 AM IST

  • Happy Birthday Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह इंडस्ट्रीत आज ज्या स्थानावर पोहोचला आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला.

Ranveer Singh

Happy Birthday Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह इंडस्ट्रीत आज ज्या स्थानावर पोहोचला आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला.

  • Happy Birthday Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंह इंडस्ट्रीत आज ज्या स्थानावर पोहोचला आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला.

Happy Birthday Ranveer Singh : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आज त्याचा ३८वा वाढदिवस साजरा करत आहे. रणवीर सिंहचा जन्म ६ जुलै १९८५ रोजी मुंबईतील एका सिंधी हिंदू कुटुंबात झाला. अभिनेता रणवीर सिंह इंडस्ट्रीत आज ज्या स्थानावर पोहोचला आहे, तिथे पोहोचण्यासाठी त्याने खूप संघर्ष केला. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत आनंदी वैवाहिक जीवन जगणाऱ्या रणवीरला सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. रणवीरने आपल्या करिअरची सुरुवात जाहिरात लेखनातून केली होती. 'बँड बाजा बारात' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

ट्रेंडिंग न्यूज

Bai Ga Teaser: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, 'सुख कळले' मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

Anupam Kher: अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, पैसे आणि चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरीला

रणवीत सिंहला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. त्यामुळे तो शालेय नाटकांमध्ये, वादविवादांमध्ये भाग घेऊ लागला. शाळेत होणाऱ्या प्रत्येक वादविवाद स्पर्धेत तो भाग घ्यायचा. त्याने एचआर कॉलेजमधून कॉमर्सचे शिक्षण घेतले. यादरम्यान रणवीर सिंह सतत ऑडिशन्स देत होता. पण, त्याची कुठेही निवड होत नव्हती. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणं तितकं सोपं नाही, हे आता रणवीरला कळून चुकलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अभिनय शिकण्यास सुरुवात केली.

Tu Chal Pudha: शिल्पी पुन्हा एकदा मयुरीच्या मनात विष पेरणार; अश्विनी विरोधात मुलीला भडकवणार!

रणवीर सिंहचे पूर्ण नाव रणवीर सिंह भवनानी आहे. रणवीरने त्याच्या नावातून 'भवनानी' हे आडनाव काढून टाकले होते. आधीच मोठे नाव आणि त्यात चित्रपटसृष्टीत या नावाने कमीच महत्त्व मिळेल, म्हणून त्याने आपले नाव कमी केले. जेव्हा रणवीरला कोणताही चित्रपट मिळत नव्हता, तेव्हा त्याने एका जाहिरात एजन्सीमध्ये लेखक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. यादरम्यान त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

या दरम्यान रणवीर ऑडिशन्स देतच होता. अखेर त्याला 'बँड बाजा बारात' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्याने बिट्टू शर्माची भूमिका साकारली होती. बिट्टू शर्माची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बरेच दिवस घालवले होते. त्याचा हा चित्रपट २०१०मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी रणवीरला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार देण्यात आला. या चित्रपटाला १५ पुरस्कार मिळाले.

विभाग

पुढील बातम्या