logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Juhi Chawla Birthday : आमिर खानवरच्या रागामुळे जुही चावलाने नाकारलेला चित्रपट, ५ वर्ष बोलणंही टाकलं! काय झालेलं?

Juhi Chawla Birthday : आमिर खानवरच्या रागामुळे जुही चावलाने नाकारलेला चित्रपट, ५ वर्ष बोलणंही टाकलं! काय झालेलं?

Nov 13, 2024, 08:56 AM IST

google News
  • Happy Birthday Juhi Chawla : जुही चावला आणि आमिर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते.

Juhi Chawla Birthday

Happy Birthday Juhi Chawla : जुही चावला आणि आमिर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते.

  • Happy Birthday Juhi Chawla : जुही चावला आणि आमिर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते.

Happy Birthday Juhi Chawla : ९०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री जुही चावला आज (१३ नोव्हेंबर) तिचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे. मिस इंडिया ते यशस्वी अभिनेत्री होण्यापर्यंतचा जुहीचा प्रवास अप्रतिम होता, पण करिअरच्या यशात तिला आई-वडिलांची साथ मिळाली नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आणि मोठ्या भावाच्या निधनानंतर जुही एकटी पडली. पण, शाहरुख खानची मैत्रीच तिचा आधार बनली. वयाच्या १८व्या वर्षी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर तिने जवळपास ८० चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक हिट चित्रपटही दिले.

तिच्या संपूर्ण अभिनय कारकिर्दीत जुहीने शाहरुख खान आणि आमिर खानसोबत चित्रपटांमध्ये काम केले, मात्र ती सलमान खानसोबत कोणत्याही चित्रपटात दिसली नाही. तर, माधुरी दीक्षितसोबत तिची स्पर्धा इतकी वाढली होती की, जुही तिच्यासोबत फक्त ‘गुलाब गँग’ या एकाच चित्रपटात दिसली होती. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर जुही चित्रपटांकडे वळली. मात्र, तिने मॉडेलिंगला अधिक वेळ दिला असता, तर मिस वर्ल्डच्या रँकपर्यंत पोहोचले असते, याची खंत तिला नेहमीच वाटत असते.

‘कयामत से कयामत तक’ने मिळवून दिली ओळख

जुहीने १९८६मध्ये आलेल्या 'सुलतानत' चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. त्यानंतर जुहीने कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिथे नशीब आजमावल्यानंतर ती पुन्हा बॉलिवूडकडे वळला. दरम्यान तिला ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून सर्वात मोठा फिल्मी ब्रेक मिळाला. तिचा हा चित्रपट तुफान गाजला. याच चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली.

आमिर खानचे सिनेमे पाहायला आवडतात? मग सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट पाहा ओटीटीवर

आमिर खानने मस्करी केली अन्...

जुही चावला आणि आमिर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून, ते दोघे एकमेकांचे चांगले मित्रही होते. पण, नंतर आमिरने जुहीसोबत अशी मस्करी केली की, त्यामुळे जुही त्याच्यापासून दुरावली. 'तुम मेरे हो' चित्रपटादरम्यान आमिरने हातात साप धरला आणि तो जुहीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. हे पाहून जुही घाबरली आणि सेटवर धावू लागली. आमिर मस्करी करत होता, पण जुहीला वाटले की आमिर काहीतरी चुकीचे करणार आहे.

'इश्क' चित्रपटाच्या सेटवर आमिरने जुहीसोबत असाच विनोद केल्यावर मात्र तिचा पार चांगलाच वाढला. त्यावेळी तो विनोद आमिरला चांगलाच महागात पडला. त्या दिवसानंतर जुही चावलाने आमिरशी बोलणे बंद केले. तिने शूटिंगला येणेही बंद केले. जुही आणि आमिरचा हा अबोला ५ वर्ष चालला. आमिरच्या या चुकीची शिक्षा जुही चावलालाही भोगावी लागली. जुही चावलाला 'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटाची ऑफर आली होती, ज्यामध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत होता. परंतु, आमिरचे नाव ऐकताच जुही चावला चिडली आणि तिने चित्रपट नाकारला. जुही चावलाच्या या कृतीने आमिरलाही धक्का बसला होता. पण, त्यानेही पुढाकार घेतला नाही.

पुढील बातम्या