मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ठरलं! पहिला मराठी AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Aarti Vilas Borade HT Marathi

May 22, 2024, 12:46 PM IST

    • काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील पहिला AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी'ची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.
'धर्मा- दि एआय स्टोरी' पहिला मराठी AI चित्रपट

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील पहिला AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी'ची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

    • काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीमधील पहिला AI चित्रपट 'धर्मा- दि एआय स्टोरी'ची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

आजकाल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येताना दिसत आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतात. आता मराठीमध्ये पहिल्यांदाच AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजेंटवर आधारित हा चित्रपट आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Union Budget: यापेक्षा अंबानींचा आणखी एखादा लग्न सोहळा पाहिला असता; केंद्रीय अर्थसंकल्पावर हे काय बोलला अश्नीर ग्रोव्हर?

Premachi Goshta: हर्षवर्धनने मिहिकाला दिले गुंगीचे औषध, 'प्रेमाची गोष्ट'मध्ये मुक्ताला कळताच काय होणार?

Union Budget 2024: देशाचं बजेट बघताना खिसाही तपासताय? बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी दिलीये पैसा कसा वापरावा याची शिकवण!

एकेकाळी कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याकडे आज आहे ३५० कोटी रुपयांची संपत्ती

कोणते कलाकार दिसणार चित्रपटात?

'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. टीझरमधील जबरदस्त संगीत ऐकूनच अंगावर शहारे येतात. एका वडील आणि मुलीची गोष्ट या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने एक वेगळा विषय मराठी सिनेसृष्टीला मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर हे कलाकार 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
वाचा: 'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

कधी होणार चित्रपट प्रदर्शित

पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. तेव्हापासूनच या वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती. अखेर या चित्रपटाची तारीख जाहीर झाली असून येत्या २७ सप्टेंबर २०२४ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे टीझरमधून स्पष्ट होताना दिसत आहे.
वाचा: नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

काय आहे चित्रपटाची कथा?

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाला, "काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली होती. एआयच्या जंजाळात अडकलेल्या आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या बापाचा प्रवास हा विषय फार आधीपासून माझ्या डोक्यात होता. तेच 'धर्मा- दि एआय स्टोरी'च्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. ज्यांना या विषयाबद्दल फारसे माहित नसेल, त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय नक्कीच समजेल. परदेशात फिल्मच्या शुटिंगदरम्यान मला थोडी दुखापतही झाली, परंतु तुम्हा सगळ्या प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी सुखरूप बाहेर आलो आणि आता येत्या २७ सप्टेंबरला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम सोबत असूद्यात."
Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

विभाग

पुढील बातम्या