फॅन्ड्री मधील जब्याच्या शालूने धर्म बदलला? नेटकऱ्यांकडून ट्रोल झाल्यानंतर राजेश्वरी खरातने हटवली ‘ती’ पोस्ट
Updated Apr 22, 2025 06:42 PM IST
- Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. अनेकांनी तिच्या धर्मांतरावर नाराजी व्यक्त करत तिच्यावर टिका केली. यानंतर… राजेश्वरीने ती पोस्ट डिलीट केली आहे.
Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. अनेकांनी तिच्या धर्मांतरावर नाराजी व्यक्त करत तिच्यावर टिका केली. यानंतर… राजेश्वरीने ती पोस्ट डिलीट केली आहे.
- Rajeshwari Kharat : राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. अनेकांनी तिच्या धर्मांतरावर नाराजी व्यक्त करत तिच्यावर टिका केली. यानंतर… राजेश्वरीने ती पोस्ट डिलीट केली आहे.
Rajeshwari Kharat : नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिने आयुष्यातील मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिलीये. म्हणजेच तिने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला असल्याची माहिती दिली आहे.
राजेश्वरीने याबाबतची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर तिला काही सकारात्मक तर काही नकारात्मक कमेंट्सना सामोरे जावे लागत आहे. राजेश्वरीने याबाबत सविस्तर कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, तिने Baptised चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर सगळीकडे खळबळ उडाली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जाऊ लागले. अनेकांनी तिच्या धर्मांतरावर नाराजी व्यक्त करत तिच्यावर टिका केली. यानंतर… राजेश्वरीने ती पोस्ट डिलीट केली आहे.
राजेश्वरीने धर्मांतराची पोस्ट का हटवली? यावर अभिनेत्रीने कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
काल (२१ एप्रिल) ईस्टर संडेला तिने याबद्दल छोटी घोषणा केली. तिने तिच्या काही मित्रांबरोबर फोटो शेअर केले आणि त्याला "देवाने मला सांगितलं की, माझ्याकडे तुझ्यासाठी काही योजना आहेत." असं कॅप्शन दिलं. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पाण्यात उभी असून तिच्या डोक्यावर धर्मगुरूंचा हात दिसत आहे. या फोटोला तिने बॅप्टीजम असं कॅप्शन दिलं होतं.
"निव्वळ पब्लिसिटी स्टंट","ख्रिश्चिन धर्मा पेक्षा ही प्राचीन आणी सूंदर असा बुद्धाचा धम्म असताना दूसऱ्या धर्माची गरज लागतेच कशाला..? बाबासाहेबांनी तब्बल 25 वर्ष अभ्यास करून हा भारतीय मूळ असलेला धम्म दिला तो असेच नव्हे..!
आंबेडकरांनी इथल्या लोकांविरोधात जाऊन जातीयवाद मिटवावा म्हणून संघर्ष केला आणि बुद्ध धर्म स्वीकार केला आपण तोच धर्म तुम्ही सोडून कॅथलिक धर्म स्वीकार केला….शेम ऑन यू,”अशी कमेंट एक युजरने केली आहे. राज्यासह देशातील अनेक ठिकाणी पैसे, ईश्वरी चमत्काराची भूल देऊन धर्म परिवर्तन केले जात आहे. सरकारने ख्रिश्चन धर्म परिवर्तन केलेल्या या लोकांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याबरोबरच ख्रिस्ती मशिनऱ्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, अशी कमेंट आणखी एका युजरने केली आहे.