मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suraj Chavan Movie: सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, साकारणार लक्षवेधी भूमिका

Suraj Chavan Movie: सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, साकारणार लक्षवेधी भूमिका

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 13, 2024, 11:19 AM IST

    • Goligat Suraj Chavan Movie: छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरज चव्हाण 'राजा राणी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
Suraj Chavan Movie

Goligat Suraj Chavan Movie: छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरज चव्हाण 'राजा राणी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

    • Goligat Suraj Chavan Movie: छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सुरज चव्हाण 'राजा राणी' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या सिझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता रितेश देशमुख सूत्रसंचालक, घरात वेगवेगळे स्पर्धक या सर्वांमुळे बिग बॉस मराठी सिझन ५ प्रेक्षकांची मने जिंकत आहे. खेळ समजला नसला, तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मनं जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सुरज स्वतःला 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात सिद्ध करताना दिसतोय. आता सूरज हा एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

काय आहे चित्रपटाचे नाव?

सूरज चव्हाण महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या या चित्रपटाचे नाव 'राजा राणी' असे आहे. "संपणार नाही प्रेम कहानी" म्हणत खरंच ते दोघं दुरावतील का?, की पुन्हा एकत्र येतील? याची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली आहे. हो कारण नुकताच 'राजा राणी' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय आणि या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवून ठेवली आहे. या चित्रपटात सूरज हा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

काय आहे टीझर?

'राजा राणी' या चित्रपटाच्या १ मिनिटे २० सेकंदाच्या टीझरमध्ये जिवापाड प्रेम करणारे दोन जिवलग कायम एकत्र पाहायला मिळाले. मात्र त्या दोघांमध्ये असं काय होतं ज्याने त्यांच्या नात्यात दुरावा येतो?. बरं हा दुरावा चित्रपटात संपलेला पाहायला मिळणार की एकमेकांचा जीव घेणार हे सारं पाहणं रंजक ठरणार असल्याचे दिसत आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या प्रेम कहाणीचा शेवट नक्की कसा असणार याची उत्सुकता आता साऱ्यांमध्येच लागून राहिली आहे. प्रियकर आणि प्रेयसीचा गावरान तडका असलेला रोमँटिक अंदाजही लक्षवेधी ठरत आहे. तसेच खेडेगावात केलेलं चित्रीकरणही पाहायला मिळतंय. एकूणच हा टीझर पाहूनसाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?

चित्रपटातील सूरजच्या भूमिकेविषयी

'राजा राणी' या चित्रपटात 'बिग बॉस मराठी' फेम गोलीगत सूरज चव्हाण हा रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. 'राजा राणी' हा चित्रपट १८ ऑक्टोबरपासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

पुढील बातम्या
नोटिफिकेशन सेंटर