logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  भांग खाऊन मित्रांसोबत चित्रपट बघायला गेले होते अमिताभ बच्चन; पोलिसांनी थांबवले अन्…

भांग खाऊन मित्रांसोबत चित्रपट बघायला गेले होते अमिताभ बच्चन; पोलिसांनी थांबवले अन्…

Oct 11, 2024, 01:56 PM IST

google News
  • Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज म्हणजेच ११ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला.

अमिताभ बच्चन

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज म्हणजेच ११ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला.

  • Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज म्हणजेच ११ ऑक्टोबरला वाढदिवस आहे. ‘कौन बनेगा करोडपती १६’च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यात आला.

Amitabh Bachchan Birthday KBC 16 Special : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आज म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी आपला ८२वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या खास दिवशी ‘कौन बनेगा करोडपती १६’चा स्पेशल एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा स्पेशल एपिसोड आणखी खास करण्यासाठी बॉलिवूड स्टार आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद खान या भागात हजेरी लावायला येणार आहेत. या एपिसोडचे काही प्रोमोही समोर आले आहेत. अशाच एका प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन आपल्या आयुष्यातील एक गंमतीशीर किस्सा सांगताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन म्हणाले की, एकदा ते गांजाच्या नशेत होते आणि पोलिसांनी त्यांना अडवले होते.

सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन होळीच्या निमित्ताने एकदा त्यांनी भांग पापड कसे खाल्ले, हे सांगताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते की, एकदा होळीच्या निमित्ताने त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी खूप भांग पापड खाल्ले होते. यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी ठरवलं की, ते सगळे चित्रपट बघायला जातील. यानंतर ते सगळे जण गाडीत बसले आणि निघाले होते. मात्र, तेव्हाच अशी एक गोष्ट घडली की, हा किस्सा ऐकताच सगळ्यांना खूप हसू येऊ लागले. 

अमिताभ बच्चन हा किस्सा सांगताना म्हणाले की, ‘आम्हाला जाताना बघून पोलीसांनी थांबवलं. मात्र, पोलिसांना सगळे म्हणाले की, आम्हाला उशीर होत आहे, म्हणून आम्ही घाईत निघालो आहोत. आम्ही गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो. गाडीचा एक्सीलरेटर दाबला. थोड्या वेळाने आम्ही पाहिले की, पोलीस आमच्या गाडीच्या एका बाजूला आहे. आम्ही त्यांना म्हणालो, की थोडं घाईत निघालो आहोत. यावर पोलीस मला पाहून म्हणाले की, गाडी आधी गिअरमध्ये तरी ठेवा.’ अमिताभ म्हणाले की, आम्ही गाडी सुरू करत होतो, पण गिअर टाकायलाच विसरलो होतो. अर्थात ही कमाल भांगेची होती.

बिग बींचा वाढदिवस

अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा पाठवत आहेत. अमिताभ बच्चन यांनी १९६९साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अमिताभ यांनी बॉलिवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अमिताभ बच्चन हे ‘शोले’, ‘खुदागवाह’, ‘शेहनशाह’, ‘हम’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘मोहब्बतें’ आणि ‘मर्द’सारख्या धमाकेदार चित्रपटांसाठी ओळखले जातात.

पुढील बातम्या