logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jaya Bachchan mother Death: जया बच्चन यांच्या आईचे निधन, भोपाळमध्ये पोहोचले संपूर्ण कुटुंब

Jaya Bachchan mother Death: जया बच्चन यांच्या आईचे निधन, भोपाळमध्ये पोहोचले संपूर्ण कुटुंब

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 25, 2024, 10:38 AM IST

google News
    • Jaya Bachchan mother Death: इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबीय भोपाळच्या दिशेने रवाना झाले आहे.
Jaya Bachchan mother Death

Jaya Bachchan mother Death: इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबीय भोपाळच्या दिशेने रवाना झाले आहे.

    • Jaya Bachchan mother Death: इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबीय भोपाळच्या दिशेने रवाना झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासूबाई इंदिरा भादुरी यांचे निधन झाले आहे. इंदिरा भादुरी यांनी वयाच्या ९४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे. इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मंगळवारी इंदिरा भादुरी यांची प्रकृती बिकट झाली होती. त्यामुळे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे तातडीने भोपाळसाठी रवाना झाले होते. पण आजाराशी इंदिरा यांची झुंज अपयशी ठरली आणि भोपाळमधील रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, इंदिरा भादुरी यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. बच्चन कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

अभिषेक आणि श्वेता पोहोचले भोपाळला

आजीच्या निधनाची बातमी कळताच अभिषेक बच्चन आजीच्या घरी पोहोचला. अमिताभ बच्चन आणि कुटुंबातील इतर सदस्य चार्टर्ड विमानाने भोपाळला पोहोचत असल्याचे सांगण्यात येत आहे. अभिषेक आणि श्वेता बच्चन त्यांच्या आजीच्या खूप जवळ होते. त्यामुळे आता आजीच्या जाण्याने त्यांना दु:ख झाले आहे.

मध्य प्रदेशमध्ये वास्तव्यास होते भादुरी कुटुंबीय

जया बच्चन यांचे संपूर्ण कुटुंबीय मध्य प्रदेशमध्ये वास्तव्यास होते. जया यांचा जन्म देखील मध्य प्रदेशमध्ये झाला होता. त्यांना आणखी दोन बहिणी आहेत. त्यांची नावे रीटा आणि नीता आहेत. रिटा यांनी अभिनेता राजीव वर्माशी लग्न केले. आता संपूर्ण भादुरी कुटुंबी भोपाळला पोहोचले आहे. संध्याकाळी इंदिरा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे बोलले जात आहे.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य

जया बच्चन यांच्याविषयी

जया बच्चन यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्या लहान वयातच सिनेक्षेत्रात आल्या होत्या. वयाच्या अवघ्या १५व्या व्या वर्षी सत्यजित रे यांच्या महानगर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले. उपहार, त्रयश, कोरा कागज, जंजीर, अभिमान, चुपके चुपके या चित्रपटात त्या दिसल्या होत्या. त्यांनी शेवटचे रॉकी और रानी की प्रेम कहाणी सिनेमात त्या दिसल्या होत्या

पुढील बातम्या