logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC : कुणाला दिली कार, तर कुणाला पैशांची मदत! ‘केबीसी’मध्ये येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन देतात मदतीचा हात

KBC : कुणाला दिली कार, तर कुणाला पैशांची मदत! ‘केबीसी’मध्ये येणाऱ्या स्पर्धकांना अमिताभ बच्चन देतात मदतीचा हात

Oct 17, 2024, 12:09 PM IST

google News
  • नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित किस्से सांगितले गेले. केबीसीचे शूट संपल्यानंतर कसे अमिताभ बच्चन सेटवर थांबतात आणि फोटो काढतात, तसेच स्पर्धकांना कशी मदत करतात, हे यात ऐकायला मिळालं आहे.

अमिताभ बच्चन

नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित किस्से सांगितले गेले. केबीसीचे शूट संपल्यानंतर कसे अमिताभ बच्चन सेटवर थांबतात आणि फोटो काढतात, तसेच स्पर्धकांना कशी मदत करतात, हे यात ऐकायला मिळालं आहे.

  • नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित किस्से सांगितले गेले. केबीसीचे शूट संपल्यानंतर कसे अमिताभ बच्चन सेटवर थांबतात आणि फोटो काढतात, तसेच स्पर्धकांना कशी मदत करतात, हे यात ऐकायला मिळालं आहे.

KBC Amitabh Bachchan : बॉलिवूड स्टार अमिताभ बच्चन यांच्या उदार स्वभावाबद्दल अनेक सेलिब्रिटी भरभरून बोलताना दिसतात. ते खूप उदार व्यक्ती आहेत. जो कोणी अमिताभ बच्चन यांना भेटतो, तो त्यांचे नक्कीच तोंड भरून कौतुक करतो. आता पत्रकार ऋचा अनिरुद्ध यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यात त्यांनी केबीसीच्या सेटवरील काही किस्से सांगितले. शोमध्ये जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेव्यतिरिक्त अमिताभ बच्चन स्पर्धकांना कशा प्रकारे पैशांची मदत करतात हे देखील त्यांनी सांगितले. 

वोन पॉडकास्टवर बोलताना ऋचा अनिरुद्ध म्हणाल्या की, जेव्हा त्या अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटल्या, तेव्हा त्या खूप नर्व्हस झाल्या होत्या. अमिताभ बच्चन यांची मुलाखत घ्यायची होती, तेव्हा आदल्या रात्री त्यांना झोपही लागली नव्हती.  

ऋचाने अमिताभ बच्चन यांचे कौतुक करत म्हटले की, तुम्ही अमिताभ बच्चन यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलात, तरी आत येण्यासाठी ते स्वतः तुमच्यासाठी दरवाजा उघडतील आणि निघताना ते सोडायला येतील. अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रत्येक माणसाने काही गोष्टी शिकल्या पाहिजेत, असे मला वाटते. ते सज्जन आहेत. केबीसीचे शूट रात्री उशिरापर्यंत व्हायचे, कधी कधी बारा-एक वाजेपर्यंत काम चालू असायचे. मला वाटायचे की, बच्चन सर किती थकले असतील, पण त्यानंतरही ते प्रत्येक व्यक्तीला फोटो काढू द्यायचे.  

भांग खाऊन मित्रांसोबत चित्रपट बघायला गेले होते अमिताभ बच्चन; पोलिसांनी थांबवले अन्…

संस्थेला केली मदत!

त्यानंतर ऋचाने सांगितले की, 'अमिताभ बच्चन अनेकदा कॅमेऱ्यावर चॅरिटी करत नाहीत, ते कुणाला सांगत नाहीत, पण ते केबीसीच्या स्पर्धकांना स्वतंत्रपणे मदतही करतात. गेल्या वर्षी ऋचा केबीसीमधल्या एका स्पर्धकाला भेटल्या होत्या. इंदूरमधील हे दाम्पत्य मूक-बधिर लोकांसाठी काम करते. या जोडप्याने सांगितले की, जेव्हा ते केबीसीमध्ये आले, तेव्हा त्यांना अमिताभ बच्चन यांच्या ऑफिसमधून फोन आला. अमिताभ बच्चन यांना स्वतंत्रपणे पैशांची मदत करायची आहे, असे त्यांना फोनवर सांगण्यात आले होते.  

अमिताभ यांना स्पर्धकाला गिफ्ट करायची होती कार!

ऋचा यांनी आणखी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाला की, ‘खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिल्लीचा एक मुलगा हॉटसीटवर बसला होता. अमिताभ यांनी त्यांना विचारले की, जर तुम्ही इतके पैसे जिंकले तर तुम्ही काय कराल? तेव्हा मुलाने सांगितले होते की, या पैशातून तो बहिणीसाठी कार विकत घेईल. कारण, एकदा बसमध्ये त्याच्या बहिणीचा विनयभंग झाला होता, तेव्हा त्याच्या बहिणीने सांगितले होते की माझी इच्छा आहे की आमच्याकडे कार असायला हवी होती. रिचाने सांगितले की, जेव्हा ब्रेक झाला तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या टीमने तिला सांगितले की, जर तो मुलगा जिंकला तर ठीक आहे. पण, तो फार पैसे जिंकला नाही, तर आम्ही त्याला गाडी देऊ. मात्र, याबद्दल कुठलाही गाजावाजा त्यांनी केला नाही. 

 

पुढील बातम्या