logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Amitabh Bachchan Birthday : खरं नाव वेगळं, जन्माने आहेत अर्धे शीख! बॉलिवूडच्या महानायाकाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत?

Amitabh Bachchan Birthday : खरं नाव वेगळं, जन्माने आहेत अर्धे शीख! बॉलिवूडच्या महानायाकाबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयत?

Oct 11, 2024, 08:57 AM IST

google News
  • Amitabh Bachchan Birthday Special: बिग बी अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आपल्या दमदार आवाज आणि अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

Amitabh Bachchan Birthday Special

Amitabh Bachchan Birthday Special: बिग बी अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आपल्या दमदार आवाज आणि अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

  • Amitabh Bachchan Birthday Special: बिग बी अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आपल्या दमदार आवाज आणि अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

Amitabh Bachchan Birthday Special: मनोरंजन विश्वाचे मेगास्टार म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन आज (११ ऑक्टोबर २०२४) त्यांचा ८२वा वाढदिवस साजरा करणार आहेत. बिग बी अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. आपल्या दमदार आवाज आणि अभिनयाने त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. वयाच्या या टप्प्यावरही अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. आजही लोक अमिताभ बच्चन यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्या आयुष्याशी प्रत्येक अपडेट्स नेहमीच लोकांना जाणून घ्यायचे असतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही खास आणि मनोरंजक गोष्टी...

श्रीवास्तव झाले ‘बच्चन’!

अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे नाव हरिवंशराय बच्चन आणि आईचे नाव तेजी बच्चन होते. अमिताभ यांचे वडील हे उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील होते आणि त्यांची आई तेजी या शीख धर्मीय होत्या. अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव ‘श्रीवास्तव’ होते, हे अनेकांना माहीत आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये याचा खुलासा केला होता. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना वाटायचे की, एखाद्याच्या आडनावावरून लोक त्याची जात ओळखतात आणि मग कामावर त्याचा परिणाम होतो. म्हणूनच त्यांनी ‘श्रीवास्तव’ हे नाव सोडून ‘बच्चन’ हे आडनाव धारण केले.

सून आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत काम करून अमिताभ बच्चन यांना झालेला पश्चात्ताप! स्वतःच म्हणाले...

अमिताभ यांचे खरे नाव माहितीय?

अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव ‘बच्चन’ नसून श्रीवास्तव होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण, अमिताभ बच्चन यांचे पहिले नाव देखील अमिताभ नव्हते, हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांचे खरे नाव इन्कलाब श्रीवास्तव होते, जे नंतर बदलून ‘अमिताभ बच्चन’ झाले. अमिताभ यांचा जन्म भारत छोडो आंदोलनादरम्यान झाला होता, म्हणूनच त्यांच्या पालकांनी त्यांचे नाव इन्कलाब ठेवले. मात्र, नंतर त्यांचे नाव बदलून अमिताभ करण्यात आले.

अमिताभ बच्चन आहेत अर्धे शीख!

अमिताभ बच्चन स्वतः एकदा केबीसीच्या मंचावर म्हणाले होते की, ते स्वतःला अर्धे शीख मानतात. कारण, त्यांची आई तेजी बच्चन या शीख कुटुंबातील होत्या. यामुळे अमिताभ बच्चन स्वतःला अर्धे कायस्थ आणि अर्धे शीख मानतात. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांनी बंगाली असणाऱ्या जया यांसोबत लग्न केले आहे. दोघांना अभिषेक आणि श्वेता ही दोन मुले आहेत.

पुढील बातम्या