logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

'दुनियादारी २' येणार? अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकरच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Aarti Vilas Borade HT Marathi

Published Jun 05, 2024 12:30 PM IST

google News
    • अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांची मैत्री 'दुनियादारी' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा हे तिघे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट दुनियादारीचा पुढचा भाग तर नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
duniyadari 2: नव्या चित्रपटाची घोषणा

अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांची मैत्री 'दुनियादारी' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा हे तिघे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट दुनियादारीचा पुढचा भाग तर नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

    • अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांची मैत्री 'दुनियादारी' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. आता पुन्हा एकदा हे तिघे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट दुनियादारीचा पुढचा भाग तर नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'दुनियादारी.' ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आजही प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहातात. पण आता पुन्हा एकदा अंकुश चौधरी ,स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर हे एकत्र चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट 'दुनियादारी २' तर नाही ना असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

नव्या चित्रपटाविषयी

एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्त्यात असल्या तरी अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, स्वप्नील जोशी, संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड पण नक्कीच सुरु झाली आहे. अशीच काहीशी उत्सुकता वाढवणारी ही घोषणा आहे. ही टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे.
वाचा: अभिनेत्री अमृता खानविलकर आणि संकर्षण कऱ्हाडेचे झाले अपहरण? काय आहे प्रकरण जाणून घ्या

चित्रपटाची तयारी सुरु

चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही टीम प्रेक्षकांना ११ वर्षांनंतर भेटीस येणार आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वजण चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
वाचा: अभिनेते अशोक सराफ यांना ‘मामा’ म्हणून आवाज का देतात? जाणून घ्या

निर्मात्याने सांगितले चित्रपटाविषयी

या चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी चित्रपटाविषयी थोडी माहिती दिली आहे. "संजय जाधवसारख्या धमाकेदार दिग्दर्शकासोबत येरे येरे पैसा, येरे येरे पैसा 3, कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार. हा चित्रपट गाजणारच!" असे अमेय खोपकर म्हणाले.
वाचा: निकालापूर्वीच 'या' खानने केले पंतप्रधान मोदी आणि भाजपचं अभिनंदन, पोस्ट व्हायरल