Marathi Natak: ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा अनोखा प्रवास; महिला दिन विशेष प्रयोगात श्वेता पेंडसे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत
Published Feb 28, 2025 12:02 PM IST
A Perfect Murder Play - थरार, रहस्य आणि उत्कंठा यांचा परिपूर्ण मिलाफ असलेला ‘अ परफेक्ट मर्डर’ या मराठी नाटकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. या नाटकाचा महिला विशेष प्रयोग ८ मार्च २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे.

थरार, रहस्य आणि उत्कंठा यांचा परिपूर्ण मिलाफ असलेला ‘अ परफेक्ट मर्डर’ या मराठी नाटकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली आहे. एका प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाच्या मराठी रुपांतराने रंगभूमीवर एक वेगळी छाप पाडली आहे.
सर अल्फ्रेड हिचकॉक यांच्या मास्टरपीसच्या मराठी रुपांतराचा पहिला प्रयोग २१ डिसेंबर २०१८ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे हाऊसफुल्ल गर्दीत सादर झाला होता. गूढता आणि रहस्य उलगडत ठेवणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत गेला. अल्पावधीतच या नाटकाने रंगभूमीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
नाटकाच्या सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये अभिनेता पुष्कर श्रोत्री याने पतीची भूमिका, अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिने पत्नीची भूमिका आणि सतीश राजवाडे यांनी इन्स्पेक्टर घारगे यांची भूमिका ताकदीने साकारली होती. पुढच्या प्रयोगांमध्ये कलाकारांच्या उपलब्धतेनुसार, पुष्कर श्रोत्री कधी नवरा तर कधी इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसले, तर अभिनेता अनिकेत विश्वासराव नवऱ्याच्या भूमिकेत झळकला होता.
या नाटकाने घेतलेले एक अनोखे वळण म्हणजे इन्स्पेक्टरच्या भूमिकेला महिला स्वरूप देण्यात आले आहे. पहिल्या ८५ प्रयोगांमध्ये पत्नीची भूमिका प्रभावीपणे साकारल्यानंतर, काही वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतलेल्या डॉ. श्वेता पेंडसे यांनी इन्स्पेक्टर घारगे या वेगळ्याच आणि ताकदीच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे. मराठी रंगभूमीवर एका अभिनेत्रीने अशा दोन अत्यंत वेगळ्या भूमिका मोठ्या अंतराने साकारण्याचा हा दुर्मिळ प्रसंग ठरला आहे.
८ मार्च २०२५ रोजी होणार महिला विशेष प्रयोग!
आता ‘अ परफेक्ट मर्डर’च्या रंगभूमीवर एक खास महिला विशेष प्रयोग सादर होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ८ मार्च २०२५ रोजी डॉ. श्वेता पेंडसे पुन्हा इन्स्पेक्टर घारगेच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा प्रयोग केवळ एक नाट्यकृती नसून, स्त्रीसशक्तीकरणाचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. एका रहस्यमय कथानकाच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही महिला पात्रे समाजातील बदल, सक्षमता आणि धाडस यांचे प्रतीक ठरत आहेत. या नाटकाचा महिला विशेष प्रयोग ८ मार्च २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्यगृह, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे.