धोनीचे शेवटचे आयपीएल? विराट कोहलीच्या कृतीने दोघांची IPL मधील शेवटची भेट असल्याची चर्चा
Published May 04, 2025 01:50 PM IST
- धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर चर्चा सुरू असून, चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या निवृत्तीच्या बातम्या वाढल्या आहेत. आरसीबी विरुद्ध सामन्यात कोहलीने धोनीसाठी कॅप काढल्याने चर्चेला वेग आला.
धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर चर्चा सुरू असून, चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या निवृत्तीच्या बातम्या वाढल्या आहेत. आरसीबी विरुद्ध सामन्यात कोहलीने धोनीसाठी कॅप काढल्याने चर्चेला वेग आला.
- धोनीच्या आयपीएल कारकिर्दीवर चर्चा सुरू असून, चेन्नई सुपर किंग्जच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या निवृत्तीच्या बातम्या वाढल्या आहेत. आरसीबी विरुद्ध सामन्यात कोहलीने धोनीसाठी कॅप काढल्याने चर्चेला वेग आला.
एमएस धोनीचं आयपीएलमधलं हे शेवटचं वर्ष आहे का? गेल्या अनेक वर्षांपासून सीएसके या प्रश्नाने स्पर्धेची सुरुवात करत आहे. ब्रॉडकास्टर्सपासून क्रिकेट पंडितांपर्यंत दरवर्षी अंदाज बांधतात की आयपीएलमधील हे त्याचे शेवटचे वर्ष असेल, परंतु धोनी धोनी आहे. चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तो पुढच्या वर्षी पुन्हा मैदानात उतरतो. पण यंदा वातावरण थोडं वेगळं दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्ज सातत्याने सामने गमावत असून धोनीची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे. अशा तऱ्हेने संघाचे भवितव्य पाहता धोनी आपल्या आयपीएल कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. आरसीबी विरुद्ध सीएसके सामन्यानंतर कोहलीने धोनीच्या सन्मानार्थ कॅप काढल्यानंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला.
वरिष्ठ खेळाडूंच्या सन्मानार्थ ज्युनिअर खेळाडू अनेकदा हस्तांदोलन करताना आपल्या टोप्या उतरवतात, पण यावेळी ब्रॉडकास्टरला त्यामागे वेगळीच भावना दिसली. त्यामुळं त्याने सामन्यानंतरचा धोनी आणि कोहलीचा फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत लिहिलं, '‘वन लास्ट टाइम '
स्टार स्पोर्ट्सच्या या पोस्टवर चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत, तुम्हीही पाहा-
कसा होता आरसीबी विरुद्ध सीएसके सामना?
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने २० षटकांत ५ गडी गमावून २१३ धावा केल्या. विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करत आरसीबीला वादळी सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकेही झळकावली, पण सलामीवीर बाद झाल्यानंतर मधली फळी चांगलीच फ्लॉप झाली. अखेरीस रोमारिओ शेफर्डने १४ चेंडूत ५३ धावांची तुफानी खेळी करत संघाला २०० च्या पुढे नेले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जकडून आयुष म्हात्रेने ९४ तर रवींद्र जडेजाने नाबाद ७७ धावांची खेळी केली. पण त्यांना संघाला विजयी करता आले नाही. लुंगी एन्गिडी आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आणि त्याने ३ गडी बाद केले. जडेजाला तीन जीवनदान मिळूनही अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्यात तो कमी पडला व बेंगळुरूने हा सामना २ धावांनी जिंकला.