logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  VIDEO: आई माझे स्वप्न अपूर्ण राहिले.. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर धाय मोकलून रडली मुलगी

VIDEO: आई माझे स्वप्न अपूर्ण राहिले.. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर धाय मोकलून रडली मुलगी

HT Marathi Desk HT Marathi

Published May 08, 2025 12:38 PM IST

google News
  • Rohit Sharma Test Retirement- : रोहित शर्माच्या या चाहतीचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता काहीच चांगलं वाटत नाही. माझं स्वप्न अपूर्णच राहिलं.
रोहित शर्माची फिमेल फॅन

Rohit Sharma Test Retirement- : रोहित शर्माच्या या चाहतीचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता काहीच चांगलं वाटत नाही. माझं स्वप्न अपूर्णच राहिलं.

  • Rohit Sharma Test Retirement- : रोहित शर्माच्या या चाहतीचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता काहीच चांगलं वाटत नाही. माझं स्वप्न अपूर्णच राहिलं.

रोहित शर्माने बुधवारी, ७ मे रोजी संध्याकाळी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून जागतिक क्रिकेटला आश्चर्याचा धक्का दिला. जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यात तो टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसेल, असे मानले जात होते, पण त्यापूर्वीच या हिटमॅनने क्रिकेटच्या सर्वात लांब स्वरूपाचा निरोप घेतला. रोहितच्या या निर्णयामुळे लाखो चाहत्यांची मने तुटली. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला. दरम्यान, रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर रडू लागलेल्या एका महिला चाहतीचा व्हिडिओ समोर आला आहे. या मुलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

रोहित शर्माच्या या चाहत्याचे नाव जिनिया देवनाथ असे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, 'आई रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मला आता बरं वाटत नाही. माझं स्वप्न अपूर्णच राहिलं. मला स्टेडियममध्ये जाऊन त्याला कसोटी सामना खेळताना पाहायचे होते. आता असे होणार नाही कारण त्याने या फॉरमॅटचा निरोप घेतला आहे.

मुलगी पुढे म्हणते की, तुम्हाला समजणार नाही, मला वाटले होते की रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही जिंकेल. मला वाटले होते की रोहित शर्मा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनेल.

तुम्हीही पाहू शकता हा क्यूट व्हिडिओ-

रोहित शर्मानंतर कसोटी कर्णधार कोण होणार?

रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाची धुरा कोण सांभाळणार, हा सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे. रिपोर्ट्सनुसार शुभमन गिल या शर्यतीत आहे, पण जसप्रीत बुमराहचं काय? तो भारतातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. मात्र त्याची दुखापत कर्णधारपदाच्या आड येऊ शकते. बुमराहने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, मात्र शेवटच्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. मालिकेचे सर्व सामने खेळू शकणाऱ्या खेळाडूची निवड करण्यावर बीसीसीआयचे लक्ष असेल. बुमराहचा फिटनेस आणि वर्कलोड पाहता त्याला कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल असे वाटत नाही. कर्णधाराच्या शर्यतीत आणखी एक नाव केएल राहुल देखील असू शकते.