logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

Published Jan 25, 2025 09:43 PM IST

google News
    • R Ashwin Padma Shri Award : गृह मंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यवरांच्या नावांची घोषणा केली आहे. भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Padma Awards : क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, तर गोलकीपर पीआर श्रीजेश याला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर

R Ashwin Padma Shri Award : गृह मंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यवरांच्या नावांची घोषणा केली आहे. भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

    • R Ashwin Padma Shri Award : गृह मंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी मान्यवरांच्या नावांची घोषणा केली आहे. भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गृह मंत्रालयाने पद्मश्री पुरस्कारासाठी निवड झालेल्या नावांची घोषणा केली आहे. अलीकडेच रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता.

त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाचा माजी गोलरक्षक पीआर श्रीजेश याला पद्मविभूषणने सन्मानित करण्यात येणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय संघासोबत कांस्यपदक जिंकल्यानंतर पीआर श्रीजेश याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली होती. 

आता श्रीजेशला नव्याने सुरू झालेल्या HIL संघ SG Pipers चे हॉकी संचालक बनवण्यात आले आहे. 

तर रविचंद्रन अश्विनची गणना क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये केली जाते. विशेषत: त्याचा कसोटी रेकॉर्ड उत्कृष्ट होता.

अश्विन कसोटी सामन्यांव्यतिरिक्त वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. चेन्नई सुपर किंग्ज व्यतिरिक्त, रवी अश्विन आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचा भाग राहिला आहे.

अश्विनने १०६ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त रवी अश्विनने ११६ एकदिवसीय आणि ६५ टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. कसोटी सामन्यांमध्ये रवी अश्विनने २४.०१ च्या सरासरीने विक्रमी ५३७ फलंदाजांना आपले बळी बनवले. या फॉरमॅटमध्ये त्याने ३७ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

तर, एकदिवसीय फॉर्मेटमध्ये, रवी अश्विनने ३३.२१ च्या सरासरीने आणि ४.९३ च्या इकॉनॉमीने १५६ विकेट घेतल्या. तर भारतासाठी टी-20 सामन्यांमध्ये त्याने ६.९१ च्या इकॉनॉमी आणि २३.२२ च्या सरासरीने ७२ विकेट घेतल्या.

याशिवाय रवी अश्विनने आयपीएलमध्ये २११ सामन्यात १८० विकेट घेतल्या आहेत.

क्रीडा जगतातील या खेळाडंचा सन्मान

पद्मभूषण

पीआर श्रीजेश-केरळ

पद्मश्री

हरविंदर सिंग- हरियाणा

आय एम विजयन- केरळ 

रविचंद्रन अश्विन- तामिळनाडू

सत्यपाल सिंग - उत्तर प्रदेश