logo
मराठी तुम्हाला पुश नोटिफिकेशन पाठवू इच्छिते. क्लिक परवानगी आहे सब्स्क्राइब
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  मैत्री, प्रेम, साखरपुडा आणि धोका...मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक

मैत्री, प्रेम, साखरपुडा आणि धोका...मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक

HT Marathi Desk HT Marathi

Published May 06, 2025 11:07 AM IST

google News
  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याला कुडी भगतानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी जोधपूरच्या कुडी भागतासानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक पांड्यासोबत खेळणाऱ्या या खेळाडूवर बलात्काराचा आरोप आहे.
Shivalik Sharma MI

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याला कुडी भगतानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी जोधपूरच्या कुडी भागतासानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक पांड्यासोबत खेळणाऱ्या या खेळाडूवर बलात्काराचा आरोप आहे.

  • इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्स संघाचा भाग असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याला कुडी भगतानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी जोधपूरच्या कुडी भागतासानी हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी अटक केली आहे. हार्दिक पांड्यासोबत खेळणाऱ्या या खेळाडूवर बलात्काराचा आरोप आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) माजी क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याला बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप करणारी महिला शिवालिक शर्माची मैत्रीण होती. दोघांमध्ये प्रेम झालं आणि त्यांचा साखरपुडाही झाला होता, पण त्यानंतर शिवालिक शर्मावर फसवणुकीचा आरोप आहे.

शिवालिक शर्मा मुंबई इंडियन्सचा भाग आहे. मात्र, सध्या आयपीएलच्या कोणत्याही संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. बडोदा संघात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासोबत तो खेळला आहे. त्याने बडोद्याकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५० हून अधिक सामने खेळले आहेत.

एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवारी गुजरातमधील वडोदरा येथील अटलादरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून शिवालिक शर्मा याला अटक केली आणि जोधपूर न्यायालयात हजर केले, अशी माहिती स्टेशन हाऊस ऑफिसर हमीरसिंग भाटी यांनी दिली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिवालिक शर्मा हा वडोदरा येथील रहिवासी असून आयपीएल २०२४ दरम्यान तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला एमआयने आयपीएल लिलावातून २० लाख रुपयांना विकत घेतले होते.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवालिकशी मैत्री झाली, ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. यानंतर शिवालिक अनेकदा जोधपूरला आला आणि त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. शिवालिकने या मुलीसोबत साखरपुडाही केला होता, असे सांगितले जात आहे. नंतर शिवालिकच्या घरच्यांनी तो तोडला आणि त्यांनी नव्या स्थळाचा शोध सुरू केला. याला कंटाळून मुलीने फिरकीपटू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप केला. आता शिवालिक शर्माला तुरुंगात जावे लागणार आहे.