BGT AUS Squad : पॅट कमिन्सनं निवडले नवे ओपनर, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, पाहा
Nov 10, 2024, 10:25 AM IST
- BGT 2024-25 Australia 1st Test Squad : पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
BGT 2024-25 Australia 1st Test Squad : पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
- BGT 2024-25 Australia 1st Test Squad : पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची ही मालिका २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी, भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यात दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. ऑस्ट्रेलिया अ संघाने भारत अ संघाचा मालिकेत २-० असा व्हाईटवॉश केला होता.
या मालिकेत ऑस्ट्रेलिया अ संघाकडून सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर नॅथन मॅकस्विनीचा पर्थ येथे होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मॅकस्वीनीसाठी ही भेट आणि टीम इंडियासाठी सरप्राईज आहे.
नॅथन मॅकस्विनीने भारत अ विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या चार डावात ५५.३३ च्या सरासरीने १६६ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या जागी नॅथन मॅकस्वीनीला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते. वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत कायमस्वरूपी सलामीवीर सापडलेला नाही.
मॅकस्वीनीची निवड करण्याचे कारण काय?
ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांनी आधीच स्पष्ट केले होते की, स्टीव्ह स्मिथ त्याच्या जुन्या बॅटिंग ऑर्डरमध्ये दिसणार आहे. नॅथन मॅकस्विनीची निवड करण्यामागच्या कारणाबाबत जॉर्ज बेली म्हणाले, “मॅकस्विनीने अलीकडेच दाखवून दिले आहे की तो धावा करू शकतो. त्याच्या उत्कृष्ट देशांतर्गत रेकॉर्डमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला. त्याने दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया-A संघांसाठी खूप धावा केल्या आहेत.
याशिवाय ऑस्ट्रेलिया-ए संघाचा भाग असलेला वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँडचाही संघात समावेश करण्यात आला आहे. बोलंड हा ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅट खेळणारा गोलंदाज आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील उर्वरित ऑस्ट्रेलियन संघात काही काळ कसोटी संघाचा भाग असलेल्या बहुतांश प्रमुख खेळाडूंचा समावेश आहे.
पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.