पीएम किसान योजनेचे पैसे आले नाहीत? काळजी करू नका! फक्त एवढं काम करा!
Oct 05, 2024, 06:31 PM IST
PM Kisan Yojana 18th installment : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर ही बातमी वाचा!
PM Kisan Yojana 18th installment : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर ही बातमी वाचा!
PM Kisan Yojana 18th installment : पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर ही बातमी वाचा!
PM Kisan Yojana 18th installment : पीएम किसान सन्मान निधीचा १८ वा हप्ता आज देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तुमच्या खात्यात PM किसानचे पैसे आले नसतील तर काळजी करू नका. तुम्ही केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून याबाबत माहिती करून घेऊ शकता.
तुमचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नसेल तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही. तसंच, जर तुम्ही तुमच्या बँक खात्याचे KYC केले नसेल, तर PM सम्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत. बँक खाते केवायसी आणि बँक खाते आधारशी लिंक केल्यानंतर, पुढील हप्ता तुमच्या खात्यात नक्कीच येईल. याशिवाय हप्ता न मिळाल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून माहिती मिळवू शकता.
माहितीसाठी येथे संपर्क साधा
पीएम किसानशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी तुम्ही टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 011-23381092 वर संपर्क साधू शकता. याशिवाय, तुम्ही अधिकृत ईमेल आयडी pm kisan -ict@gov.in वर देखील संपर्क साधू शकता. इथं तुमच्या तक्रारीची दखल घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल.
eKYC करण्याचा हा सोपा मार्ग
> सर्वप्रथम PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
> होम पेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा आणि eKYC चा पर्याय निवडा.
> आता तुम्हाला eKYC पेजवर जाऊन तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.
> आधार क्रमांक टाका आणि सर्च पर्यायावर क्लिक करा.
> यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
> नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल.
> OTP टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
> तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करताच eKYC पूर्ण होईल.
> यानंतर, तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल की तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अशा प्रकारे तपासू शकता सद्यस्थिती
> सर्वप्रथम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जा.
> होम पेजवर 'नो युवर स्टेटस' या पर्यायावर क्लिक करा.
> यानंतर एक नवीन विंडो उघडेल.
> येथे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नोंदणी क्रमांक टाकावा लागेल.
> यानंतर तुम्हाला Get OTP वर क्लिक करावे लागेल.
> तुम्ही OTP टाकताच तुमची स्थिती दिसेल.
विभाग