Surya Gochar 2025: होळीला सूर्याचे मीन राशीत गोचर, या ३ राशींना मिळतील मोठे लाभ
Published Feb 18, 2025 03:39 PM IST
- Surya Gochar 2025 : सुमारे वर्षभरानंतर सूर्य गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. होळीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार सूर्याच्या मीन राशीच्या संक्रमणाचा फायदा-
Surya Gochar 2025 : सुमारे वर्षभरानंतर सूर्य गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. होळीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार सूर्याच्या मीन राशीच्या संक्रमणाचा फायदा-
- Surya Gochar 2025 : सुमारे वर्षभरानंतर सूर्य गुरूच्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. होळीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होईल. जाणून घ्या कोणत्या राशींना होणार सूर्याच्या मीन राशीच्या संक्रमणाचा फायदा-
Surya Gochar: वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्य १४ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ०६ वाजून ३२ मिनिटांनी गुरूच्या मीन राशीत प्रवेश करेल आणि १३ एप्रिल २०२५ पर्यंत या राशीत राहील. होळीच्या दिवशी सूर्याचे मीन राशीचे गोचर होईल. सूर्याचे मीन राशीत संक्रमण झाल्याने काही राशींना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात शुभ परिणाम प्राप्त होतील. वृषभ, मिथुन आणि धनु राशीच्या लोकांना या संक्रमणाचा आर्थिक आणि व्यावसायिक लाभ मिळू शकतो.
संबंधित फोटो
Daily Horoscope 17 February 2025 : कामाचा ताण असणार! वाचा सर्व राशींचे थोडक्यात भविष्य
Weekly Love Horoscope: त्रिग्रही योगात या राशींचे प्रेमजीवन होईल रोमँटिक,वाचा साप्ताहिक प्रेम भविष्य
Daily Horoscope 16 February 2025 : चढ-उतारांनी भरलेला दिवस असणार! वाचा सर्व राशींचे थोडक्यात भविष्य
Daily Horoscope 14 February 2025 : कसा जाईल आजचा प्रेमाचा दिवस! वाचा सर्व राशींचे थोडक्यात भविष्य
Daily Horoscope 13 February 2025 : बॉस तुमच्या कामावर खूश असेल! वाचा सर्व राशींचे थोडक्यात भविष्य
Daily Horoscope 12 February 2025 : उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील! वाचा सर्व राशींचे थोडक्यात भविष्य
वृषभ
सूर्याचे मीन राशीत होणारे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. करिअरमध्ये तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्ही गुंतवणूक केली असेल तर, या गुंतवणुकीवर तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. सूर्याच्या या गोचरामुळे वृषभ राशीच्या जातकांना आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही या गोचरामुळे धनसंचय करण्यातही यशस्वी व्हाल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुमचे आरोग्य उत्तम राहील.
मिथुन
सूर्याचे मिथुन राशीचे गोचर आपल्या दहाव्या स्थानात होईल. या काळात तुम्हाला वैयक्तिक विकासाच्या संधी प्राप्त होतील. तुम्ही या काळात प्रवास करण्याची शक्यता आहे. तुम्हाला नोकरीत नवीन संधी मिळू शकतात. मिथुन राशीच्या व्यापाऱ्यांना चांगला फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही समृद्ध व्हाल. तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये वाढ होईल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही चांगले राहाल. जोडीदारासोबत आपण आपल्या भावना व्यक्त करू शकाल.
धनु
सूर्य मकर राशीच्या चौथ्या स्थानात भ्रमण करणार आहे. सूर्याच्या या गोचराच्या प्रभावामुळे आपल्या कामातील अडथळे दूर होतील. तुम्हाला कामानिमित्त बराच प्रवास करावा लागू शकतो. नोकरीत तुम्हाला तुमचे नशीब साथ देईल. सूर्याच्या गोचरामुळे होणाऱ्या स्थितीमुळे आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगल्या स्थितीत असाल. तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. सूर्याच्या या गोचराच्या स्थितीमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहील.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
विभाग