मराठी बातम्या  /  क्रीडा  /  INDvsIRE: भुवनेश्वर कुमार बनला T-20 मधला नंबर वन बॉलर, अनोख्या विक्रमाची नोंद

INDvsIRE: भुवनेश्वर कुमार बनला T-20 मधला नंबर वन बॉलर, अनोख्या विक्रमाची नोंद

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jun 26, 2022 11:43 PM IST

भुवनेश्वर कुमारने २०२ टी-२० सामन्यांमध्ये २६८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत क्रिकेटमध्ये ६३ तसेच, एकदिवसीय सामन्यात १४१ तर टी-२० मध्ये ६८ बळी आहेत.

bhuvaneshwar kumar
bhuvaneshwar kumar

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने इतिहास रचला आहे. भुवनेश्वरने आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी याला शुन्यावर क्लीन बोल्ड केले. यानंतर भुवनेश्वर कुमार हा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. या विक्रमात त्याने वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि न्युझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदी यांना मागे टाकले आहे.

पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज (टी-२०)

सॅम्युअल बद्री - ५० डावात ३३ विकेट्स

भुवनेश्वर कुमार - ६१ डावात ४३ विकेट्स

टीम साऊदी - ६८ डावात ३३ विकेट्स

शकीब अल हसन - ५८ डावात २७ विकेट्स

जोश हेझलवूड - ३० डाव २६ विकेट्स

भुवनेश्वर कुमारने २०२ टी-२० सामन्यांमध्ये २६८ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत क्रिकेटमध्ये ६३ तसेच, एकदिवसीय सामन्यात १४१ तर टी-२० मध्ये ६८ बळी आहेत.

दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना २:३० तास उशीराने सुरु झाला आहे. सामन्यातील षटकेही कमी करण्यात आली आहेत. आता हा  १२-१२ षटकांचा खेळवण्यात येत आहे.

उमरान मलिकचे आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण-

टीम इंडिया आणि आयर्लंड यांच्यात आज डब्लिनमध्ये टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यातून भारताचा तुफानी गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या हस्ते त्याला टी-२० कॅप देण्यात आली. T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताकडून ९८ वा खेळाडू आहे. उमरान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संघातही होता, पण त्याला प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात आली नाही.

WhatsApp channel