मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Relationship Tips: अरेंज्ड मॅरेज करणार आहात? लग्नाआधी जोडीदाराला हे महत्त्वाचे प्रश्न नक्की विचारा

Relationship Tips: अरेंज्ड मॅरेज करणार आहात? लग्नाआधी जोडीदाराला हे महत्त्वाचे प्रश्न नक्की विचारा

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Dec 02, 2022 10:51 AM IST

Marriage Tips: जर तुम्ही अरेंज्ड मॅरेज करणार असाल तर तुमच्या भावी जोडीदाराला काही प्रश्न आधीच विचारा.

रिलेशनशिप टिप्स
रिलेशनशिप टिप्स (Freepik )

लग्न हा मुलगा आणि मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय असतो. जर लोकांना आधीच त्यांच्या लाइफ पार्टनरला माहित असेल म्हणजेच प्रेमविवाह करत असतील तर त्यांना या नात्याबद्दल आणि त्यांच्या जोडीदाराबद्दल बरेच काही माहित आहे. पण जेव्हा अरेंज्ड मॅरेजचा प्रश्न येतो तेव्हा अनेकदा लोकांना त्यांच्या भावी जोडीदाराविषयी सर्व काही माहीत नसते. कुटुंबीय त्यांच्यासाठी जीवनसाथीचा शोध घेतात. त्या व्यक्तीशी २-३ भेटी होतात आणि याच भेटीतच तुम्हाला ठरवायचं आहे की समोरच्या व्यक्तीशी लग्न करायचं की नाही. अ‍ॅरेंज्ड मॅरेज करणाऱ्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात, ज्यांची उत्तरे वेळेवर मिळत नाहीत,  मग पुढचे आयुष्य अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत जर तुम्ही अरेंज्ड मॅरेज करणार असाल तर तुमच्या भावी जोडीदाराला काही प्रश्न आधीच विचारा.

लग्न करायचे आहे की नाही?

लग्नापूर्वी प्रत्येक व्यक्तीने आपल्या पार्टनरला विचारले पाहिजे की तो या लग्नासाठी तयार आहे का? अनेकवेळा लोक घरच्यांच्या दबावाखाली लग्न करायला तयार होतात. कदाचित तो तुम्हाला आवडत नसेल आणि कौटुंबिक दबावाखाली लग्न करण्यासाठी हो म्हणाला असेल. अशा परिस्थितीत भविष्यात नाते टिकवणे कठीण होईल. म्हणूनच त्यांना लग्नाची संमती विचारा आणि हो मिळाल्यावरच कोणतेही पाऊल उचला.

करिअरबद्दल विचारा

तुम्हाला जोडीदाराच्या करिअरच्या योजनांबद्दल पूर्वीपेक्षा जास्त माहिती नसते. ही नंतर एक समस्या बनू शकते. त्यामुळे लग्नापूर्वी जोडीदाराला विचारा की करिअर प्लॅन काय आहे. त्याला भविष्यात काय करायचे आहे आणि लग्नानंतर तो त्या दोघांचे चांगले भविष्य कसे तयार करू शकेल. याशिवाय त्यांना तुमच्या करिअर प्लॅनबद्दल सांगा आणि त्यांचे मत घ्या. कदाचित मुलीला नोकरी करायची असेल पण जीवनसाथी त्यासाठी तयार नसतो. त्यामुळे त्यांना आणि तुमच्या करिअरची योजना स्पष्ट करा.

मुलांबद्दल विचारा

लग्नानंतर कुटुंब वाढवण्याबद्दल जोडीदाराला काय वाटते याबद्दल प्रश्न विचारा. जाणून घ्या कुटुंब नियोजन आणि मुलांबद्दल त्यांचे काय मत आहे. तुम्हाला काय हवे आहे ते देखील स्पष्ट करा.

पूर्वीचे संबंध

कधी-कधी आधीच्या नात्यामुळेही नात्यात अडचणी येतात. जेव्हा लग्नानंतर लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या पूर्वीच्या नात्याबद्दल माहिती मिळते आणि तो मुद्दा बनतो आणि भांडण सुरू होते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या मागील आयुष्याबद्दल प्रश्न विचारा. जर तुम्हाला भूतकाळातील जीवनाबद्दल आधीच माहिती असेल तर नंतर कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या